पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 9 व्या हप्त्याची रक्कम या तारखेला
पी एम किसान योजनेच्या नव्या हप्त्यासाठी दोन हजार रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट नोव्हेंबर चा पैसा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे 10 ऑगस्ट पर्यंत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 9 व्या हप्त्याची रक्कम या तारखेला PM Kisan Yojana
या योजनेअंतर्गत केवळ ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पी एम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. सरकारने आतापर्यंत 8 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
पी एम किसान सन्मान योजनेच्या नव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. दहा ऑगस्ट पर्यंत पी एम किसान सन्मान योजनेच्या नव्या त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाऊ शकते.