पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत आता सरकारी नोकरदारांना मिळणार 6 हजार रुपये PM kisan samman nidhi yojana

पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत आता सरकारी नोकरदारांना मिळणार 6 हजार रुपये

पी एम किसान सन्मान निधी योजना(PM kisan samman nidhi yojana) अंतर्गत तीन हप्तामध्ये शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात.सध्या मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनेतील आर्थिक मदत ही 3 हप्ता द्वारे केली जाते.

पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत आता सरकारी नोकरदारांना मिळणार 6 हजार रुपये PM kisan samman nidhi yojana

सध्या शेतकरी वर्ग या योजनेच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे.याच दरम्यान सरकारने यात काही अटी घालून दिले आहेत.ती म्हणजे इ केवायसी. सरकारने एक आनंदाची बातमी सुद्धा दिली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे आता सरकारी नोकरी करणाऱ्या उमेदवाराला सुद्धा पी एम किसान योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आता वर्षाकाठी सहा हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. परंतु कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना पैसा मिळणार हेसुद्धा जाणून घेऊया.

पी एम किसान सन्मान निधी नुसार सरकारी संस्थांमध्ये काम करणारे मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप डी आणि चतुर्थ श्रेणी मध्ये काम करणारे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. जर त्यांच्या कुटुंबातील कोणतीच व्यक्ती याचा लाभ घेत नसेल तरच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेचा लाभ या कर्मचार्‍यांना मिळत नाहीत असे लोक ज्यांच्याकडे शेत जमीन आहे पण ते आयकर भरतात.डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट,वकील,अभियंता वास्तुविशारद असे लोक जे व्यावसायिक म्हणून नोंदणीकृत आहेत आणि ज्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे तसेच केंद्र राज्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी केंद्र व राज्य सरकारच्या मंत्री,खासदार,आमदार महापौर, जिल्हा पंचायतीच्या विद्यमान माजी अध्यक्ष या योजनेचा भाग घेऊ शकत नाहीत.

जर एखादा शेतकरी शेत जमिनीचा वापर शेतीसाठी न कारता इतर कामासाठी वापरत असेल तर त्याला योजनेचा लाभ भेटणार नाही. त्याचप्रमाणे आता हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी इ केवायसी आवश्यक झाले आहे. त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे ही योजना शेतकरी कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका सदस्याला मिळू शकतो पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यापैकी फक्त एक म्हणजे पती किंवा पत्नी या योजनेची साठी नोंदणी करू शकतात दुसरीकडे चुकीची माहिती देऊन एखाद्या व्यक्तीने योजनेचा लाभ घेतला तर त्याचा अर्ज रद्द होणार नाही तर त्याला दिलेली रक्कम सुद्धा वसूल केले जाईल.

Leave a Comment

x