प्रधानमंत्री आवास योजना PM Aawas Yojana

प्रधानमंत्री आवास योजना

देशातील जे लोक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत जे लोक झोपडपट्टीत राहतात त्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर नाही तसेच ज्यांच्याकडे घर विकत घेण्यासाठी पैसे नाहीत अशा लोकांना योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पक्की घरे देण्यात येणार आहेत. संपूर्ण देश झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत साकारले जाणार आहे त्यासाठी सन 2022 पर्यंत देशातील सर्व लोकांसाठी घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

1 देशातील गरीब लोकांकडे ज्यांची स्वतःची घरे नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत स्वतःची घरे दिले जातील.
2 केंद्र सरकार या योजनेमार्फत 2022 पर्यंत हाऊस फॉर ऑल अभियानाअंतर्गत सर्वांचे घर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करीत आहे.
3 इंदिरा आवास अंतर्गत आर्थिक साहाय्य रक्कमही साध्या भागात 70 हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजार रुपये पर्यंत तसेच डोंगराळ किंवा कठीण भागात घर बांधण्यासाठी 75 हजार रुपयांपासून ते 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
4 इंदिरा आवास योजनेअंतर्गत हे दिलेले आर्थिक रक्कम ही लाभार्थी गरीब कुटुंबाला तीन हत्यांमध्ये दिली जाते.
5 सर्व लाभार्थ्यांना दिलेली मदत थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.
6 या योजनेसोबत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि मनरेगा अंतर्गत शौचालयाच्या बांधकामासाठी 12 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते.

इंदिरा गांधी आवास योजनेसाठी पात्रता

1 आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा
2 ज्याला घर विकत घ्यायचे आहे किंवा घर बांधायचे आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो
3 जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बिनशेती कर्मचारी अल्पसंख्यांक प्रवर्गातील गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील
4 ज्याच्याकडे स्वतःचे घर नाही तसेच जे रस्त्यावर किंवा झोपड् पट्टीत आयुष्य घालतात ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असतील
5 जर कोणी नोकरी करत असेल तर त्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र सहा महिन्याची स्लिप आरटीआर अर्ज करताना सादर करावा लागेल
6 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे

See also  शैक्षणिक कर्ज कसे घ्यायचं?Education Loan

प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी

अपंग नागरिक, माजी सेवा कर्मचारी,महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती कुटुंब समाजातील उपेक्षित विभागातील नागरिक, मुक्त बंधपत्रित कामगार, विधवा महिला

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड जॉब कार्ड चे साक्षांकित फोटो काफी उत्पन्न प्रमाणपत्र बीपीएल श्रेणी प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे ज्याद्वारे लोक पोर्टलला भेट देऊ शकतात त्या अंतर्गत यांची नावे यादी मध्ये समाविष्ट केली जातील त्यांना सरकार पक्की घरे प्रदान करेल या शिवाय ज्यांची नावे या यादीमध्ये दिसत नाही ते पुन्हा अर्ज करू शकतात

2 thoughts on “प्रधानमंत्री आवास योजना PM Aawas Yojana

  1. PM आवास योजना साठी लागणारे documents, आणि पात्रता आणि कुठे कुठे लाभ घेऊ शकतो याची सविस्तर माहिती कुठे मिळेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x