किटकजन्य आजार
डेंगू -डेंगू हा डासांपासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे.जगामध्ये डेंगू हा आजार मागील तीन दशकांपासून आढळून आलेला आहे. डेंगू हा विषाणू पासून होणारे आजार असून त्याचा प्रसार एडीस इजिप्टाय डास यामार्फत होतो मागील दोन दशकांपासून डेंगूताप डेंगू रक्तस्त्राव ताप व डेंग्यू शॉक सिंड्रोम रुग्ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे मानवातील संसर्ग हा विषाणू एडिस ए जीपटाय डास चवल्यामुळे होतो हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा
प्रसार मानव डास मानव असा असतो. या डासाची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी टाक्या टाकाऊ वस्तू यात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.डेंगू तापाची लक्षणे इतर विषनुजन्य गंभीर तापाच्या लक्षणा सारखेच असतात. उदा.अचानक चडणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, रक्तस्राविय डेंगू ताप ही गंभीर अवस्था आहे.याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवस याची लक्षणे साध्या डेंगू ताबा सारखेच असतात व त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंगू तापाचे निदान अंगावरील दर्शनी भागावर उदाहरणार्थ हातपाय चेहरा व मान यावर असलेल्या पुरुळांवरून केले जाते हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो.मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. अनियंत्रित लोकसंख्या वाढ.
अनियंत्रित शहरीकरण. कचऱ्याचे अपुरे व योग्य व्यवस्थापन,अनियमित पाणीपुरवठा, जागतिक पर्यटनात होणारे वाढ, ग्रामीण भागातील मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील आणि जीवनशैलीतील बदल. डेंगू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला संपूर्ण विश्रांती घेणे बाबत सल्ला देणे अतिशय महत्त्वाचे असते. रुग्णाचे तापमान जर 39 डिग्री सेल्सिअसच्या खाली राहण्यासाठी ताप प्रतिबंधक औषधे देणे व रुग्णांना ओल्या कपड्याने पुसून घेणे आवश्यक असते. ज्या रुग्णांना जास्त प्रमाणात वेदना होतात त्यांना वेदनाशामक औषधे देण्याची आवश्यकता भासू शकते.ज्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात उलट्या-जुलाब मळमळ घाम येतो अशा रुग्णांना शरीरातील पाणी कमी होऊ शकते. त्यासाठी घरी बनवलेला फळांचा रस होऊ द्यावे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. पाणी ठेवलेला भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे. घरा, जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी घराच्या सभोवताली व छतावर वापरात नसणारे टाकू साहित्य ठेवू नये.
हिवताप
हिवताप हा मानवास फार पूर्वीपासून माहीत असलेल्या रोगापैकी एक रोग आहे.प्लाज्मोडियम प्रजातीच्या एक पेशीय सुक्ष्म परजीवी जंतू संसर्ग झाल्याने हिवताप होतो आणि त्याचा प्रसार काही विशिष्ट प्रजातीच्या ॲनाफिलीस मादीमुळे होतो.मानवाला खालील चार विविध हिवताप परजीवी मुळे होतो प्लाज्मोडियम व्हॅय व्हक्स,प्लेअसमोडियम फलसीपयर्न प्लासमोडियम मलेरी,प्लासमोडियम अव्हेल,हिवताप परजीवी दोन जीवन चक्रआत वाढतो मानवी शरीरातील जीवन चक्र आणि डासांच्या शरीरातील जीवन चक्र. वय, लिंग वंशाचा गरोदर पन लोकांचे स्थलांतर, माणसाच्या सवयी,व्यवसाय इत्यादी घटक हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात. मानवास हिवतापाची लागण केवळ अनाफिलीस डासाच्या मादिमुळे होते. भारताच्या बहुतांश भागात हिवताप हा विशिष्ट ऋतूत होणारा आहे. ह्या आजारांचे जास्तीत जास्त प्रमाण जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळते. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान सांडपाण्याचे नियोजन इत्यादी बाबी हिवताप प्रसारास कारणीभूत ठरतात.
हिवतापाचा प्रसार काही विशिष्ट जातीच्या दुषित अनाफिलीस मादी चावल्यामुळे होते. त्वचेद्वारे, स्नायू दारे, शिरे द्वारे देण्यात येणार्या रक्त आणि प्लाझा मुळे अपघाताने हिवताप लादला जाऊ शकतो तापामध्ये दाखवा डोकेदुखी मळमळ थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणेअशी लक्षणे दिसतात ताप वाढत जातो तीव्र स्वरूपाचे डोकेदुखी आणि उलट्या होणे ही साधारण लक्षणे दिसतात व तापामध्ये शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्याचे स्पर्श केल्यास त्वचा गरम आणि कोरडी वाटते. भरपूर घाम येऊन ताप कमी होतो. तापमान कमी होऊन त्वचा थंड होते हे तापाचे निदान सर्वसाधारणपणे रक्त नमुना द्वारे सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी केली जाते. सर्वसाधारणपणे रक्तनमुने हिवताप सूक्ष्म परजीवी शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र द्वारे तपासणी करण्याची पद्धत वापरली जाते. हिवतापाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या कमी करण्याकरता नियंत्रणात्मक उपाय हिवताप बाबतीत जनतेत जागृती निर्माण करणे.तापाचे निदान त्वरित ओळखले तर रोग्यानचे होणारे मृत्यू टाळता येतात. साचलेले पाणी साठवण या बाबत घ्यावयाची खबरदारी उदाहरणार्थ पाण्याच्या साठ्यामध्ये गप्पी मासे सोडले नाही डास उत्पादन स्थानात डासोत्पत्ती रोखले जाते .पर्यायाने जोखीम कमी करण्यास मदत होते
चिकनगुनिया
चिकनगुनिया व्हायरस या विषाणूमुळे होणारा व एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरणारा आजार आहे. चिकनगुनिया आजारही दूषित एडीस इजिप्ती डासाच्या चाव्यामुळे होतो. हि डासांची मादी चिकनगुनिया आजारी रुग्णाचे रक्त शोशुन् बाधित होत असते आजाराची लक्षणे साधारण दुषित डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसानंतर दिसून येतात.या आजारांमध्ये काही लक्षणे दिसून येतात उदाहरणार्थ ताप हुडहुडी, डोके दुखणे, मळमळ होणे ओकारी होणे तीव्र सांधेदुखी, अंगावरील पुरळ या आजारात वाक् येणे किंवा कंबरेतून वाकलेला रुग्ण हे हे नेहमी आढळणारे लक्षण आहे. चिकनगुनिया आजारातून बरे होताना पुष्कळदा नेहमी व सतत राहणारे सांधेदुखी आढळून येते. त्याकरता दीर्घकाळ वेदनाशामक उपचारांची गरज भासू शकते.चिकनगुनिया आजाराचे निदान एलायझा या रक्ततपासणी द्वारे करण्यात येते.
चिकनगुनिया आजाराकरिता विशिष्ट औषध उपचार उपलब्ध नाही या आजारात लक्षणांनुसार उपचार केल्यास व वेदनाशामक औषध घेतल्यास तसेच भरपूर आराम केल्यासच रुग्णाला हे फायद्याचे ठरते. आजारी व्यक्तीला वाचवण्याकरता काळजी घ्यावी जेणेकरून इतर व्यक्तीमध्ये आजाराचा प्रसार होणार नाही. काही उपाययोजना आपण करू शकतो घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी आठवड्यातून रिकामे करा. पाणी साठवण्याचे सर्व भांडे योग्य पद्धतीने झाकून ठेवा. घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा शक्य तर पूर्ण अंग झालेल असे कपडे वापरावेत निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर किंवा आसपास ठेवू नका.
तीव्र मेंदूजवर
यामध्ये प्रामुख्याने जपानीस मेंदू जर चण्डिपुरा मेंदूजवर इत्यादी आजार आहेत वैद्यकीयदृष्ट्या विषाणू जिवाणू बुरशी परजीवी जंतू स्पायरोसिसकाही रसायने तत्वे येथे घटकांमुळे मज्जासंस्थेवर होणाऱ्या परिणामांचे आजारांच्या लक्षणांचा समूह आहे.ऋतुमानाप्रमाणे व भौगोलिक क्षेत्रानुसार घटकाच्या परिणामांमध्ये भिन्नता असते काही विषाणूजन्य मेंदूदाहमध्ये आजाराची तीव्रता व मृत्यु चे प्रमाण जास्त असते.हा रोग केंद्रीय मज्जा संस्थेवर परिणाम करतो. मृत्यूचे प्रमाण या रोगात फार जास्त आहे. जे रुग्ण वाचतात त्या रुग्णांमध्ये मज्जेवर दुष्परिणाम होतात लहान मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे या रोगाचे बद्दल लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आहे.
अपंगत्व मृत्यू इ कमी करण्या करता चांगले वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक आहे. आजाराची तीव्रता होणारे परिणाम हे विशिष्ट विषयांवर रुग्णाची प्रतिकारशक्ती वातावरणातील विविध घटक या वर अवलंबून आहे आजाराचा प्रसार आयुष्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. कालावधी हा वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळा आहे लक्षणे डोकेदुखी,ताप, बेशुद्ध अवस्था संभ्रमावस्था, अचेतन अवस्था, हातपाय थरकाप, संपूर्ण शरीर लुळे पडणे ह्या आजारावर निश्चित असा कोणताही उपचार नाही परंतु रुग्णांच्या लक्षणानुसार वेळेत केलेला उपचार मोलाचा ठरतो.
प्लेग
प्लेग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा रोग असून प्लेग हा यारसिनिया पेस्तीस नावाच्या जिवाणूमुळे होतो हे प्लेग जिवाणू बाधित व्यक्तीच्या रक्त प्लीहा यकृत आणि इतर अंतर्गत अवयवमध्ये आढळून येतात.प्लेग जिवाणू हा त्यास अनुकूल वातावरणामध्ये कुरतडणाऱ्या प्राण्याच्या बिलातील मातीमध्ये वाढू शकतो.मानवामध्ये प्लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्यतः उंदीर व त्यावरील पिसवामुळे होतो उंदरांमुळे प्रगतिशील देशांमधील विशेषतः ग्रामीण भागामध्ये या रोगाचा उद्रेक आढळतात. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हा रोग होऊ शकतो मानवाच्या दैनंदिन कार्यामध्ये उदाहरणार्थ शिकार असेल पशुपालन,शेतीची मशागत व बांधकामाच्या व्यवसाय दरम्यान या पेशव्यांच्या सान्निध्यात आल्याने हा या रोगाचा प्रसार होतो. कच्च्या मातीच्या घरांमध्ये या रोगाचा प्रसारक पिसवा होऊन त्यांना पोषक वातावरण मिळाले या रोगाचा प्रसार जास्त आढळून येतो.
बाधित पिसवा मार्फत या रोगाचा प्रसार प्राण्यांमध्ये व प्राण्यांपासून मानवास होतो शरीरावर झालेल्या जखमांना मधून या रोगजंतूंचा प्रत्यक्ष संसर्ग होतो या रोगाचा प्रसार बाधित व्यक्तीच्या प्राण्यांच्या खोकल्यातून शिंकणातून बाहेर पडणाऱ्या थेंबा वाटत देखील होतो संसर्ग झाल्याचे यावेळी झालेल्या व्यक्तीस ताप थंडी खोकला व श्वास घेण्यास त्रास होतो अशा रुग्णात रक्तमिश्रित थुंकी पडते संसर्ग बाधित व्यक्तींना वेळेस उपचार न झाल्यास अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो प्लेग अधिशयन कालावधी एक ते तीन दिवस असून यामध्ये तीव्र शोषण दहा तीव्र ताप खोकला रक्तमिश्रित थुंकी आणि थंडी अशी लक्षणे आढळतात प्लेग रोग संशयित किंवा बाधित व्यक्ती अथवा प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा पिसवा यांचा चव झाल्यास प्रतिजैविकांचा उपचार घेणे योग्य ठरते.