शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्याचे फायदेशीर उपाय
Platlets प्लेटलेट्स हा शरीरातील महत्त्वाचा घटक सतत आजारी असाल तर डॉक्टरी सल्ल्यानुसार तपासण्या कराव्या लागतात. आजारपणामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. डॉक्टरांचा औषधोपचार आपण घेतो औषधोपचार घेत असतानाच आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केला तर प्लेट्लेटस वाढविण्यास मदत होईल. प्लेटलेटची कमतरता यामुळे आपल्या शरीराला आणि आरोग्याला त्रास सहन करावा लागतो. निरोगी शरीराचे लक्षण म्हणजे शरीरात प्लेटलेट्स चे योग्य प्रमाण असणे आणि त्यांनी योग्य रित्या कार्य करणे. आपल्या आहारातून आपण प्लेटलेट्सची संख्या सहज वाढू शकतो.
शरीरातील प्लेटलेट्स वाढविण्याचे फायदेशीर उपाय Platlets
1) आपल्या आहारामध्ये प्रथिने विटामिन ए,विटामिन सी, विटामिन के,झिंक फॉलिक ऍसिड इत्यादी पौष्टिक घटक समाविष्ट केले तर प्लेटलेट्स वाढवण्यावर प्रभावी उपाय सिद्ध होईल.
2) आपल्या आहारात पपई, सफरचंद, डाळिंब, यासारखे फळे तसेच आहारात दही, आवळा,ग्रीन टी नारळाचे पाने, पपईच्या पानाचा रस पीने देखील फायदेशीर उपाय आहे.
3)प्लेटलेट्स वाढविण्यात ज्वारी खूप उपयुक्त आहे. दररोज आहारामध्ये ज्वारीची भाकरी सेवन केली तर प्लेटलेट्स वाढतील.
4) प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोरफड गुणकारी आहे.
5) गिलोय म्हणजेच गुळवेल चा वापर देखील यासाठी रामबाण उपाय आहे. गिलोय तुळशीचा पाण्यात उकळून घ्या आणि काढा तयार करा. ह्या काढ्या चा दररोज वापर केल्यास फायदा होईल.