stress, depression in marathi,मानसिक तणाव समुपदेशन का आवश्यक, phycosis stress

मानसिक तणाव नैराश्य

मानसिक तणाव,नैराश्य,तणावामागील कारणे, समुपदेशन का आवश्यक, phycosis stress. आज आपण 21 व्या शतकामध्ये वाटचाल करत आहोत.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.मानवाची वैज्ञानिक प्रगती भरपूर प्रमाणात होऊन,संगणकीय युगात वावरणाऱ्या मानवाला क्षणार्धात कुठेही संपर्क साधणे शक्य झाले आहे. सर्व मानव प्राण्यांमध्ये मानव हा प्राणी अत्यंत हुशार असून कुशाग्र बुद्धीचा मानला जातो. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर सर्वच मानव प्राण्यांचा स्वतःच्या उत्कर्षासाठी वापर केला आहे व करीत आहेत. वैज्ञानिक प्रगतीबरोबरच मानव हा अत्यंत प्रगतीशील, प्रयोगात्मक म्हणून ओळखला जातो. मानवाने आज सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेले आहे परंतु ही प्रगती करत असतानाच तो एकमेकांविषयी असणारा स्नेह, आपुलकी,प्रेम ,माया,नातेसम्बध हे हळूहळू विसरून गेला आहे.

Owl in Marathi Owl Information in Marathi 36 घुबड

आपलेपणाच्या पराकोटीच्या लालसेपोटी त्याने स्वतःला अनेक गुंतागुंतीच्या अनैसर्गिक गोष्टीत गुंतून घेतले आहे. त्यामुळेच पराकोटीचे नैराश्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीशी समायोजन न झाल्यामुळे असे व्यक्ती नकारात्मक वृत्ती कडे वळून आत्मघाताला प्रवृत्त होत असतात. अशा समायोजन न साधता येणाऱ्या कमालीचा नकारात्मक दृष्टीने जोपासणाऱ्या व्यक्तीं नैराश्यला बळी पडून शेवटी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आत्महत्या करतात. आज लोकशाही शासन प्रणाली मध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे.

हे करीत असताना प्रत्येकाने मानवी मूल्यांचे जतन करून कर्तव्यदक्ष असावे असे अपेक्षित आहे जगातील सर्वसामान्यांचा विचार केला असता असे दिसून येते की अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांना स्वतः च्या क्षमतांचा विसर पडताना दिसतो व नको त्या करता गोष्टीसाठी धाव पडतात व यामध्ये अपयश आल्यास बळी पडून अशाप्रकारे सर्व क्षमतांच्या पलीकडचा निर्णय घेण्यामुळे अनेक समस्यांमध्ये आवडतात. जेव्हा समस्या सुटणार असे वाटते तेव्हा त्याचा अतिरिक्त ताण मनावर पडत असतो. मनुष्य सतत तणावग्रस्त असते प्रत्येक व्यक्तीमध्ये तणाव सहन करण्याची क्षमता असते. मानसिक तणाव,नैराश्य,तणावामागील कारणे, समुपदेशन का आवश्यक, stress, depression in marathi,phycosis stress

तणावाची स्थिती वाढल्याने काय होऊ शकते?

तणावाची स्थिती वाढत गेल्यास व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना वाढीला लागून माणूस स्वतःला दोषी समजायला लागतो अशा तणावग्रस्त स्थिती मधून बाहेर पडणे अत्यंत जिकिरीचे असते त्यासाठी समुपदेशनाची गरज असते. कित्येक आत्महत्येला बळी पडलेल्या व्यक्तींच्या कारणांचा शोध घेतला असता मानसिक तणावाचे मुख्य कारण दिसून येते. यासाठी ती व्यक्ती नकारात्मक स्थितीतून बाहेर पडून अधिका अधिक सकारात्मक कशी होईल यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.परंतु आज धावपळीच्या युगात या गोष्टीकडे लक्ष द्यायला पुरेसा लोकांकडे वेळ नाही.

परंतू परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तणावग्रस्त व्यक्तींवर समुपदेशनाचे उपचार करणे आवश्‍यक असते आणि त्यामुळे शासनाने देखील आत्महत्या रोखण्यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना सुरू करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. मानसिक तणाव,नैराश्य,तणावामागील कारणे, समुपदेशन का आवश्यक, phycosis stressअगदी शाळांमधील विद्यार्थ्यांचे उदाहरण घेतले तर शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येते की आत्महत्या करणे यामागे नापास होणे, मित्रांबरोबर समायोजन साधता न येणे, त्यामुळे स्वतःचा होऊ शकणारा अपमान, त्यामुळे विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतात तसेच आई वडिलांचे न ऐकणे म्हणजे संताप निर्माण होणे.

लहानपणी कोणते शिक्षण द्यावे?

मुळात शालेय वय हे खेळता-खेळता शिकण्याचा असते परंतु आज हे या वयात शिकताशिकता खेळणे अशी अवस्था निर्माण झाली आहे. स्पर्धेत आपण सर्वांच्या पुढे असावे असे विचार त्यांच्या मनात कोंबून कोंबून भरले गेले असतात. जणू काही त्यांच्यासाठी पुढचा नंबर हा जीव की प्राण असा होतो . तोच नंबर न मिळाल्यास असे विद्यार्थी स्वतःला अपराधी समजून त्याची शिक्षा स्वतःला करून घेण्यासाठी आत्महत्येला बळी पडल्याचे दिसून येते.

येथे लक्षात घेतले पाहिजे की मुलांना जे आवडेल ते त्यांना करू द्या ज्या मुळे नैराश्य येणार नाही पण आज बऱ्याच अंशी शालेय विद्यार्थ्यांना समुपदेशन करायचे वेळ किंवा अवस्था निर्माण झाली आहे. समुपदेशक यांच्याद्वारे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना समुपदेशन करून त्यांचे मनोबल वाढऊन विद्यार्थ्य असा प्रवृत्तीला बळी पडणार नाहीत. शालेय विद्यार्थ्यांसोबत सर्वात अधिक प्रमाण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवक वर्ग व महिलांचा समावेश अधिक असतो.

युवक म्हटला के सळसळत्या रक्ताचे तसेच क्षमता युक्त ही व्यक्ती असते. त्यांच्यात कमालीची शारीरिक मानसिक तसेच वैचारिक क्षमता काहीही करण्याची तयारी असते.तसेच चिकित्सक वृत्ती आते सर्व जग जिंकण्याची जणू स्पर्धाच त्यांच्या मनात निर्माण झालेले असते. मानसिक तणाव,नैराश्य,तणावामागील कारणे, समुपदेशन का आवश्यक, phycosis stress. क्षमता व भावनांचे सांगड योग्य ते घालता न आल्यामुळे अनेकदा त्यांचे निर्णय चुकण्याची शक्यता अधिक असते अशा चुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्यांचे पराकोटीची दमछाक होत असते. आपली पूर्ण शक्ती पणाला लावू न त्यांना हव्या असलेल्या उद्दिष्ट साध्य करता आले नाही तर मात्र आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचताना स्वतःचे प्रयत्न कमी पडतात,

नकारात्मकता कशी कमी करावी?

स्वतःला अनेक प्रकारचे दोषारोपण करतात व आपल्यामध्ये लायकीच नाही क्षमता नाही आता आपणाकडून काही होणार नाही अशा प्रकारची नकारात्मक प्रवृत्ती वाढीला लागून तशाच प्रकारची परिस्थिती परत-परत निर्माण झाल्यास हा वर्ग आत्महत्येला बळी पडतो. असे होऊ नये यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. लोकांमध्ये सकारात्मक वृत्ती कसे वाढेल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासाठी त्यांच्या पालकांसह समाज व प्रशासनाने ही काळजी घ्यावी. जेणेकरून युवक युवकच राहू शकेल कोणत्याहीकठीण परिस्थितीत तोंड देतील लोकांप्रमाणेच मध्यमवर्गीय महिला वर्गात नैराश्यप्रवृत्ती जाणवत आहे बऱ्याच महिला वैयक्तिक निर्णय हे त्या स्वतः घेऊ शकत नाही आजही त्यांना इतरांच्या विचाराप्रमाणे वागावे लागते.

जेव्हा त्यांच्यावर इतरांचे विचार लादले जातात मनात नसतानाही त्या विचारांना प्रतिसाद द्यावा लागतो. आणि हे करीत असतानाही जर त्यांना अपयश आले व अशी जबाबदारी स्वतःला घ्यावी लागल्यास त्यावेळी त्यांचा स्व जागृत होऊन कारण नसताना इतरांच्या दबावाला आपण बळी पडू पडत आहोत असे वाटते. अशाच प्रकारचे प्रसंग अनेकदा निर्माण झाल्यास त्यांच्यात नैराश्य येण्याची शक्यता असते. अशा नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असते. मुळात महिलाही जगत्जननी असून सुद्धा तिच्या विचारांना पुरुषप्रधान संस्कृतीने कायमच दबावात ठेवण्याचे काम केले आहे.

ताणताणाव का वाढवू नये?

म्हणून अशा मनाने हळव्या असणाऱ्या महिलावर्गाचा मानसिक ताण तणाव अधिक वाढवून त्या स्वतःचा जीव गमावून बसतात.सर्वसाधारणपणे आत्महत्याचे प्रमाण वरील कारणाने वाढत असले तरी प्रत्यक्षात आधुनिकीकरण व धडपडीच्या काळात आत्मपरीक्षण नसल्याने व्यक्तीकडून अनेक अपेक्षा केल्या जातात.

मानसिक तणाव,नैराश्य,तणावामागील कारणे, समुपदेशन का आवश्यक, phycosis stress या प्रत्येक वेळेत पूर्ण होतातच असे नाही.बर्‍याचदा त्यांना परिस्थिती जबाबदार असते उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या बाबतीत नैसर्गिक आवश्यक असणारे पर्जन्यमान बी बियाणे मालाच्या भाव, आर्थिक चलन, कर्जबाजारीपणा इत्यादी तर नोकरवर्गामध्ये अनेक जबाबदाऱ्या पेलताना अधिकाऱ्यांचे दडपण येते.इ कारणे कारणीभूत असू शकतात

थोडक्यात आत्महत्येला प्रवृत्त होण्यासाठी कोणतेही कारण अशा परिस्थितीला जबाबदार असते अशी परिस्थिती व कारणे निर्माण होऊ नये याचा विचार व्हायला पाहिजे ज्या व्यक्ती सतत तणावग्रस्त वाटतात त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रभावी उपाययोजना केल्यास आत्महत्येला आपण लगाम घालू शकतो म्हणजेच आत्महत्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो.

Leave a Comment

x