पशु किसान क्रेडिट कार्ड योजना Pashu Kisan Credit Card Yojana

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पैशाच्या अभावी शेतकऱ्यांचे किंवा पशुपालकांचे जनावरे आजारी पडल्यास पैशाच्या अभावांमुळे गरीब पशुपालकांना त्यांच्यावर उपचार करता येत नाही अशा परिस्थितीत पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत केली जाईल.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना Pashu Kisan Credit Card Yojana

अशा शेतकऱ्यांना फायदा होतो ह्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनाही पशुपालनस प्रोत्साहन मिळावे यासाठी पशुपालक किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हा या योजनेमागचा मुख्य उद्दिष्ट आहे.

आवश्यक पात्रता

1 पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे
2 ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे
3 ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही
4 जे शेतकरी गाय बकरी म्हशी इत्यादी पशूंचे पालन करतात अशा सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल

क्रेडिट कार्डचा लाभ कसा असणार?

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत कोणत्याही शेतकरी एखाद्या गाईचा पाठपुरावा करत असेल तर त्यांना प्रती गाय 40000 रुपये देण्यात येईल तसेच म्हशीचे पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत प्रत्येक म्हशीला रुपये 60 हजार रुपये देण्यात येतील. जर पशुपालक शेतकऱ्यांनी शेळीचे पालन केले तर त्याला प्रति शेळी चार हजार रुपये देण्यात येतील किसान पशुपालक योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी केंद्र शासनाकडून 1 लाख 60 हजार पर्यंतचा निधी मिळवू शकतात.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही लोन रक्कम मिळते ते पशुपालक शेतकऱ्याला पुढील वर्षी 4 टक्के व्याज दरासह परत करावे लागेल जेव्हा पशुपालक शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळते तेव्हाच कर्ज परतफेडीचा कालावधी एका वर्षापासून सुरू होतो

अर्ज कोठे करायचा?

पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ घेणे देण्यात येतो त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाईन बँकेमार्फत कर्ज पशुपालक क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागेल पशु शेतकरी क्रेडीट कार्ड साठी ऑफलाइन बँकेमार्फत अर्ज करू शकता त्यासाठी आपल्याला बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी एक फॉर्म घ्यावा लागेल आपल्याला केवायसी कागदपत्रे फॉर्म मध्ये भरावे लागतील केवायसी डॉक्युमेंट्स म्हणून आधार कार्डचा वापर अनिवार्य आहे मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यासारखे कागदपत्रेही सोबत ठेवावी.

Leave a Comment

x