Child obesity in india,लहान मुलांमधील लठ्ठपणा,लठ्ठपणा का वाढतो

लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा

लहान मुलांमधील लठ्ठपणा,लठ्ठपणा का वाढतो, पालकांनी काय करावे,obesity of child. मुलांमधील वाढता लठ्ठपणा हा पालकांसाठी फार मोठी समस्या आहे. काही मूलव लठ्ठ तर काही बारिक असतात.लठ्ठ असतील तर समस्या आणि बारीक असेल तरीही समस्या. कोरोनामुळे जेमतेम आठ ते नऊ महिने लहान मुले ही घरात असल्यामुळे सहाजिकच लठ्ठपणा आला असेल तसेच काही मुले हे लहानपणापासूनच लठ्ठ असतात या वाढत्या लठ्ठपणामुळे ते शारीरिक फिटनेस व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणामध्ये आणि इतर खेळांमध्ये मन लागत नाही. शारीरिक फिटनेस जर चांगला असेल तर मुले शिक्षणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये यशस्वी होण्यास मदत होते. मुलांवर लक्ष ठेवणारे म्हणजे पालक. पालकांनी मुलांकडून कोणत्या गोष्टी करून घ्याव्यात हेच आपण या सदर लेख मध्ये पण बघणार आहोत. पालकांनी मुलांच्या शाळेतील शारीरिक फिटनेस उपक्रमांमध्ये विशेष रस द्यावा.

माकडांविषयी 44 सत्य Amazing Fact about Monkeys

जर तुमची मुले एकलकोंडी असतील इतर मुलांसोबत खेळण्यास तयार नसतील, तर तुम्ही त्यांना वैयक्तिक खेळ किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवा. ज्यामध्ये पालकांनी सुद्धा सहभागी व्हावे.ज्यामुळे ते स्वस्थ आणि निरोगी राहतील. पालकांनी मुलांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा. एका संशोधनात मुले टीव्ही पाहणे, मोबाईल, कंप्यूटर,प्लेस्टेशन यामध्ये जास्त रमनिय आढळून आले आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यामधील लठ्ठपणा अधिकच वाढत जातो.सर्व गेम्स हे कॉम्पुटर वर असल्यामुळे मुले मैदानी खेळ खेडण्यास तयार होत नाहीत. यासाठी पालकांनी मुलांच्या गजेट्स वापरण्यावर व जक फुड खाण्यावर निर्बंध घातले पाहिजेत.पालकांनी मुलांना ताजे अन्न पदार्थ खाण्यास द्यावे.ताज्या भाज्या आणि फळांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठी मुलांच्या आहारात त्याचा समावेश करा.

काय करावे?

ज्यामुळे मुलांच्या शरीरातील फॅट्स कमी होतो. व मॅटबॉलीजम सुधारेल. लहान मुलांना पौष्टिक पदार्थ याची चव आवडत नसल्यामुळे ते पदार्थ खाण्यासाठी टाळाटाळ करतात. पण चांगले पोष्टीक पदार्थ मुलांना खाण्यास लावणे हे पालकांचे प्रमुख कर्तव्य आहे. मुलांना पालेभाज्या खाण्याचे प्रोत्साहन द्या. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयन फायबर व कल्शियम विटामिन बी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे मेटाबोलिजम सुधारते व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामुळे मुलांची स्मरणशक्ती देखील वाढते. पालकांनी मुलांना भरपूर फळे खाण्यास द्या.उदा सफरचंद, केळी, चिकू पपई, सीताफळ, फळांमध्ये विटामिन ए सी आणि इ असते जे शरीरासाठी आवश्यक असते.

फळांमुळे मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढते व मेटाबोलिजम सुधारते. मुलांना मधल्या वेळेत थोडे फळे दिल्याने मुलांचे पोट भरेल त्यामुळे ते वजन वाढवणारे इतर पदार्थ खाणार नाहीत. पालकांनी मुलांच्या पौष्टीक खाण्यावर भर द्यावा ज्यामध्ये उदाहरणार्थ गहू,ओट्स बार्ली,वाटाणे सोयाबीनसारख्या पौष्टीक धान्यामुळे मेंदू कार्यक्षम होतो व शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते या पदार्थांमुळे मुलांचे भूक व्यवस्थित बांधल्यामुळे बाहेरचे खाणे प्रमाण खाद्यपदार्थ कमी खातात.मुलांना दूध खुप आवडते दुधातून कल्शियम मिळते. मुलांना नियमित दूध द्यावे. पालकांनी मुलांना ड्रायफ्रुट खाण्यास द्यावे. ड्रायफ्रुट्स मध्ये उदाहरणार्थ अक्रोड बदाम मध्ये जिंग सारखे पोषणमूल्ये असतात.

फायदे कोणते मिळतात?

त्यामुळे मेंदूला योग्य चालना मिळते. ड्रायफ्रूट्स मध्ये त्वरित ऊर्जा देण्याचे देखील क्षमता असते शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. काही मुले हे दिवसभर खेळत राहिल्याने पाणी पीत नाहीत. पाणी हा शरीरासाठी आवश्यक असा घटक आहे. तेव्हा पालकांनी मुलांना भरपूर पाणी पिण्यास द्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते व शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकल्या जातात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने मेटाबोलिजम सुधारते. लिंबू पाणी, नारळ पाणी फळांच्या सेवनाने देखील शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. पालकांच्या दृष्टीने मुलांसाठी अभ्यास महत्त्वाचा असतो तर मुलांसाठी खेळणे महत्वाचे असते .

पालकांनी अभ्यास जर सांगितले तर मुले अभ्यास करत नाही ते खेळास प्राधान्य देतात.अशावेळेस पालकांनी सुद्धा मुलांनी योग्य वेळ ठरवून खेळास प्राधान्य द्यावे. काही मुले हे फक्त अभ्यासामध्ये हुशार असतात म्हणजे तासन तास अभ्यास त्यांना आवडतो अशामुळे सुद्धा बसून बसून लठ्ठपणा वाढू शकतो. असे मुले खेळाकडे कमी लक्ष देतात काही मुले खेळाकडे जास्त लक्ष देऊन अभ्यासाकडे कमी लक्ष देतात.पालकांनीसुद्धा खेळ अभ्यास ह्याचा योग्य समन्वय साधून मुलांमध्ये ऍक्टिव्हिटी करण्यास प्राधान्य द्यावे. काही मुले एकांतात खेळणे पसंत करतात तर काही मुले हे ग्रुप नुसार खेळतात. मुलांना जर खेळण्याची इच्छा झाली तर त्यांना आवश्यक खेळ खेळू द्या. तसेच मुलांचा जर ग्रुप असेल तर मुलांच्या ग्रुप मध्ये स्वतः खेळू द्या. ज्यामुळे ते शारीरिक फिटनेस योग्य ठेवतील.

इतर फायदे

एक तास जर अभ्यास करायचा असेल तर एक तास खेळण्यासाठी सुद्धा द्या. तसेच मुले हे पोषक आहार घेतात की नाही याकडे लक्ष द्यावे.योगासने यांना प्राधान्य द्या सकाळी उठल्यानंतर अर्धा तास झाला योगासने केले तर शारीरिक फिटनेस योग्य ठेवण्यास मदत होईल परंतु लहान मुलांचे योगासने कोणते याचा नीट अभ्यास करा. मुलांमध्ये चिडचिडेपणा येत असेल तर त्यांना एकांतात फिरायला घेऊन जा. आवडीच्या गोष्टी करण्यास सांगा. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा येणार नाही. लहान मुलांना सायकल चालवणे अतिशय आवडते.सायकल चालवण्याचा छंद असेल तर मुलांना निश्चितच सायकल चालवण्याचा धान्य द्या.

त्याचप्रमाणे काही मुलांना रनिंग करण्याचे असते धावणे आणि पोहणे हे लहान मुलांना द आवडते तसेच शाळांमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या सर्व स्पर्धे मध्ये मुलांना सहभाग घेण्यास प्राधान्य द्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो ज्यामुळे सुद्धा मुले शारीरिक फिटनेस योग्य राहण्यास मदत होते. योग्य आहार,अभ्यास, खेळ एकत्र संतुलन साधले तर शारीरिक फिटनेसयोग्य राहील लठ्ठपणा येणार नाही.

Leave a Comment

x