नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2021 Nrega Job Card List 2021

नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2021

केंद्र सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 मनरेगा अंतर्गत देशातील गरीब कुटुंबीयांना जॉब कार्ड प्रदान केल्या जाते.

नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2021 Nrega Job Card List 2021

सर्व अकुशल कामगारांना नरेगा अंतर्गत काम दिले जाते आणि त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसे दिले जातात. हे पेमेंट थेट बँक हस्तांतर ना द्वारे कामगारांच्या बँक खात्यात पाठवले जाते या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे अनिवार्य आहे आणि जर लाभार्थ्यांचे खाते नसेल तर नरेगा जॉब कार्ड दाखवून आपले खाते उघडू शकतो. ग्रामपंचायतीकडून नरेगाची रक्कम रोखीने दिले जाते जिथे बँक किंवा पोस्ट ऑफिस सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी रोख रकमे द्वारे पेमेंट केले जाते नरेगा चे पैसे रोख रक्कम याद्वारे घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

मनरेगा जॉब कार्ड साठी पात्रता
1 अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे
3 अर्जदार अकुशल श्रमासाठी स्वयंसेवक असणे आवश्यक आहे
4 रेशन कार्ड, आधार कार्ड पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
5 मोबाईल नंबर,निवास प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला

नरेगा जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र 2021

इच्छुक लाभार्थी यांना त्यांचे नाव नरेगा जॉब कार्ड यादी महाराष्ट्र 2021 मध्ये पाहायचे आहे त्यांनी खालील प्रकारे पाहू शकता
सर्वात आधी तुम्हाला nrega.nic.inअधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर मुखपृष्ठ उघडेल. मुखपृष्ठावर तुम्हाला रिपोर्टस अशे ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करून नंतर जॉब कार्ड वर क्लिक करावे लागेल. नंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला देशातील सर्व राज्यांची नावे दिसतील तुम्हाला महाराष्ट्र या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठ उघडेल या पृष्ठावर तुम्हाला विचारलेले संपूर्ण माहिती भरावी लागेल याने सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल नंतर तुमच्यासमोर नरेगा जॉब कार्ड लिस्ट 2019 पीडीएफ अशाप्रकारे येईल.

जॉब कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज

जॉब कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी nrega.nic.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल नंतर मुखपृष्ठ तुमच्यासमोर उघडेल. मुखपृष्ठावर तुम्हाला ग्रामपंचायतचे ऑप्शन दिसेल तुम्हाला या ऑप्शन मधील डाटा डाटा एंट्री या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल नंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला राज्य म्हणून महाराष्ट्र निवडावे लागेल आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल पुढे नवीन पृष्ठ उघडेल व त्यावर तुम्हाला एका नरेगा जॉब कार्ड फॉर्म दिलेला असेल तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती भरून सबमिट करावे लागेल.

Leave a Comment

x