नाकाचे हाड का वाढते?जाणून घ्या Nose tips

नाकाचे हाड का वाढते? जाणून घ्या.

नाकातील हाड वाढणे यालाच वैद्यकीय भाषेत टर बिनेट हायपर ट्रॉफी असे म्हणतात टरबिनेट म्हणजे नाकाच्या आत जाणाऱ्या श्वासाला गरम किंवा नरम करणारी स्थिती अशावेळी टरबीनेट चा आकार वाढला की श्वास घ्यायला अडथळा निर्माण होतो सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अशा स्थितीला नाकात हाड वाढले असे आपण म्हणतो.याची प्राथमिक लक्षणे म्हणजे संसर्ग आणि श्वास घ्यायला त्रास होणे नाकातून रक्त येणे, ऍलर्जिक वातावरणात बदल आणि सायनस संसर्गाच्या कारणामुळे टरबीनेट वाढू लागते आणि ते आकुंचन पावते वेळीच उपचार केला नाही तर नाकातील हाड वाढू लागते.

नाकाचे हाड का वाढते?जाणून घ्या Nose tips

नाकातील हाड वाढणे ची लक्षणे

नाक वाहने,जोर-जोरात घोरणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, चेहरा दुखणे, तोंडाने श्वास घेणे,घसा कोरडा पडणे, नाक बंद पडणे.

नाकातील हाड वाढण्याचे कारणे

अमली पदार्थाचे सेवन, हार्मोन्समधील बदल, वाढते वय, हवेतील बदलामुळे होणारी एलर्जी, सर्दी पळस दीर्घकाळापासून सायनस मुळे होणारे सुज,

नाकातील हाड वाढणे यापासून बचाव करण्यासाठी काय करावे

1)एलर्जी करणाऱ्या सूक्ष्म विषाणू पासून बचाव करायला हवा.
2) धुम्रपान करत असाल तर सवय सोडावी लागेल.
3) घरात जर पाळीव प्राणी असेल तर बेडरूम पर्यंत येऊ देऊ नका.
4) घरात धुळ माती येऊ देऊ नका. नाकातील हाडांच्या तपासणीनंतर डॉक्टर औषधांच्या मदतीने एलर्जी कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि सूज कमी करतात जेव्हा समस्या वाढत जाते तेव्हा शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.

Leave a Comment

x