क्षय रुग्णासाठी निक्षय पोषण योजना
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार क्षयरोग (NTEP-National Tuberclusis EliminationProgramme)पीडितांना आर्थिक सहाय्य करते. ह्या योजनेअंतर्गत 500 रुपये आपल्या देशातील क्षयपीडित रुग्णांना उपचार आणि पौष्टिक आहारासाठी अर्थ सहाय्य करते.
क्षय रुग्णासाठी निक्षय पोषण योजना Nikshay Poshan Yojana
टीबी हा एक गंभीर आजार आहे.परंतु काही लोकांकडे रोगांचा उच्चार करण्यासाठी पैसे नसतात आणि आजाराच्या वेळी पौष्टिक आहारासाठी सरकार त्या लोकांना आर्थिक मदत करते या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही निक्षय पोषण योजना च्या आरोग्य केंद्रावर नोंदणी करू शकता आणि ओळखीचे क्षय पीडित रुग्णाचे मदत सुद्धा करू शकता.
टीबी हा एक अतिशय धोकादायक रोग आहे.या रुग्णाला योजलेल्या पोषण आणि औषधे मिळाले नाही तर त्याचे जीवनमान खूप कमी होऊ शकते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टीबीच्या औषधांबरोबरच रुग्णाला उत्तम अन्नाची आवश्यकता असते. केंद्र सरकारने निक्षय (Nikshay)न्यूट्रिशन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत रुग्णांना केंद्र सरकार दरमहा 500 रुपये आर्थिक साहाय्य पुरवते.क्षय रुग्ण 6 महिने उपचार घेण्यासाठी 3000 रुपये मिळतील.या योजनेअंतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मदत देण्यात येणार आहे. जर एखाद्या रुग्णाचे स्वतःच्या नावाने बँक खाते नसेल तर अशा परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंट नंबर चा वापर करून पैसे मिळवू शकता.
निक्षय पोषण योजना पात्रता
देशातील टीबी ग्रस्त लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या अधिकृत रुग्णालय निश्चय पोर्टलवर नोंदणी केली जाईल त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल.जरआधीपासूनच टीबीचे उपचार घेत आहेत ते पात्र असतील.
निक्षय पोषण योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1)डॉक्टरांनी प्रमाणित केलेल्या आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र
2)रुग्णांना त्यांचे अर्ज भरावे लागतील
3) बँक खाते पासबुक
आपल्याला अद्याप कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास आपण टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या सोडवू शकता टोल फ्री क्रमांक 1800116666 किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क करू शकता.