आता स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट New UPI service

आता स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट

भारतीय रिझर्व बँकेने(RBI) ज्यांच्याकडे स्मार्टफोन(smartphone)नाही अशा युजर्ससाठी खास सेवा लॉंच केली आहे. UPI 123 pay असे या नव्या सेवेच नाव आहे.

आता स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट New UPI service

यामुळे ग्रामीण भागातील डिजिटल पेमेंट नेटवर्क वाढवण्यास मदत मोठी मदत होणार आहे. या नव्या सेवेद्वारे युजर्सनाही पेमेंट करता येणार आहे. त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फिचर फोन आहे स्मार्टफोन नाही. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही नवी सेवा मंगळवारी लॉंच केले.

आकडेवारीनुसार भारतात सुमारे 40 कोटी असे लोक आहेत जे अद्यापही फिचर फोनचा वापर करतात. दरम्यान युपीआय पेमेंट करताना काय अडचणी येऊ नये यासाठी 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले समाजातील वंचित घटकांना विशेष ग्रामीण भागातील लोकही या सेवांचा वापर करू शकणार आहेत. फिचर फोन त्याला म्हणतात ज्यामध्ये केवळ कॉलिंग आणि मेसेज यांची सुविधा असते देशातील बहुसंख्य लोक हेच फोन वापरतात. विशेषतः ग्रामीण भागात या फोनचा मोठा वापर होतो पण या फोनमध्ये ॲप डाऊनलोड करण्याची सुविधा नसल्याने अनेक नवे सेवा युजर्स ना वापरता येत नाहीत पण आता रिझर्व्ह बँकेने UPI123pay च्या मदतीने पिक्चर फॉर्ममध्ये स्मार्टफोन प्रमाणे डिजिटल पेमेंट ची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. युजर्स ना याद्वारे कमीत कमी पेमेंटही करता येणार आहे.

Leave a Comment

x