बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड UIDAI चा उपक्रम New Born Baby Aadhar Card

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड

सध्याच्या काळात अगदी जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य गोष्ट आहे.

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड UIDAI चा उपक्रम New Born Baby Aadhar Card

शैक्षणिक व व्यावसायिक कामासाठी,बँक मध्ये सुद्धा आधार कार्ड महत्त्वाचे आहे. आतापर्यंत नवजात बालकाचा आधार कार्ड तयार करत नव्हते कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात.

भारतीय रहिवाशांना पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी क्रमांक दिला जातो त्याला आधार क्रमांक म्हणतात. आधार कार्ड हे आता लहान मुलांसाठी Child Aadhar Card अनिवार्य आहे. पाच वर्षाखालील मुलांकडे आधार कार्ड असावे यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधार कार्ड दिलं जातं. लहान मुलांचे आधार कार्ड ला “बालआधार कार्ड” असे संबोधले जाते. त्याचा रंग निळा आहे या बाल आधार कार्डचा उपयोग शाळेत दाखला घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्या पर्यंत होतो.

आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI देशात एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये नवजात बालकांना जन्मताच आता हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करण्याची तयारी केली आहे UIDAI आणि रुग्णालय यांनीसुद्धा यासाठी तयारी सुरू केली आहे.आतापर्यंत नवजात बालकाचा आधार तयार करत नव्हते कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात. मात्र आता नवजात बालकाला जन्मासोबत बाल आधार कार्ड मिळणार आहे. जन्माच्या वेळी बाळाचा फोटो क्लिक करून आधार कार्ड दिले जाईल. हे आधार कार्ड त्याच्या पालकांपैकी एकशी जोडले जाईल. पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक घेतले जात नाहीत जेव्हा मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या बायोमेट्रिक्स घेतले जातील. देशातील 99 टक्के लोकांची आधार अंतर्गत नोंदणी झाली आहे. त्यामध्ये आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे.देशामध्ये दरवर्षी दोन ते अडीच कोटी मुले जन्माला येतात. त्यामुळे आता New Born Baby Aadhar Card जन्मताच लहान बालकांना आधार मिळणार आहे.

Leave a Comment

x