MPSC मार्फत 15, 511 पदभरतीस वित्त विभागाची मंजुरी
राज्यातील विविध विभागातील 15511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली आहे.
MPSC मार्फत 15,511 पदभरतीस वित्त विभागाची मंजुरी MPSC Vacancy
मागील सोळा महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सर्व क्षेत्रावर परिणाम झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवर याचा परिणाम झाला. काही दिवसांपूर्वी परीक्षा स्थगित करण्यात आल्या. राज्यातील विविध विभागात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा घेणे धोकादायक होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी विधानसभेत 31 जुलै पर्यंत एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. रिक्त पदे भरण्याचा विभागाने प्रस्ताव दिले होते त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता 2018 पासून विविध विभागातिल रिक्त पदांची भरती केली जाणार आहे ही रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत.
विविध विभागात अ,ब,क,श्रेणीतील बरेच पदे रिक्त आहेत यामध्ये अ श्रेणी 4417 ब श्रेणी 8031 क श्रेणी 3063 एकूण 15 511 पदे भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.अभ्यासाची तयारी सुरू पण परीक्षा नाहीत कोरोना काळामध्ये बरेच परीक्षाही रद्द करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थी सतत दोन ते तीन वर्षापासून अभ्यास करत असून विद्यार्थ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.