2 जानेवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली MPSC exam postponed

2 जानेवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

कोरोना चा वाढता संसर्ग तसेच लॉक डाऊन पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत आणि काही परीक्षा रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे.

2 जानेवारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली MPSC exam postponed

त्याच प्रकारची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ते म्हणजे एमपीएससी(mpsc) परीक्षा संदर्भात 2 जानेवारी 2022 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द करण्यात आले असून परीक्षेचे नवीन तारीख(exam date) लवकरच घोषित करण्यात येईल.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी वय मर्यादा ओलांडलेली उमेदवारांना परीक्षा देता आली नाही त्या उमेदवारांना शासनाने आणखी एक संधी दिली आहे. त्यामुळेच या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षामध्ये कोरोना आणि लॉक डाऊनमुळे शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. या काळात अनेक उमेदवारांचे वय मर्यादा ओलांडून गेली होती. अशा उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी हुकली होती. त्यामुळे आता शासनाने या उमेदवारांचा विचार करून त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. 1 मार्च 2021 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत ज्या उमेदवारांचे वय ओलांडून गेले आहे त्यांना मुदत वाढ देण्यात आली असून या उमेदवारांना 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत या कालावधीत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे तसेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे परीक्षा शुल्क भरता येणार आहे. एकंदरीत शासनाने विद्यार्थ्यांसाठी चांगला निर्णय घेतला असून गेल्या वर्षामध्ये त्यांचे वय मर्यादा ओलांडून गेली आहे अशा विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधीच देण्यात आली आहे.या निर्णय मुळे mpsc च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

x