मिशन कवच-कुंडल covid-19 लसीकरण मोहीम Mission Kavach kundal Covid 19 Vaccination

मिशन कवच-कुंडल covid-19 लसीकरण मोहीम

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात मिशन कवच कुंडल या मोहिमेला सुरुवात होत आहे. ह्या मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करावयाचे आहे. दिनांक 8 ते 14 ऑक्टोबर 2021 दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे.

मिशन कवच-कुंडल covid-19 लसीकरण मोहीम Mission Kavach kundal Covid 19 Vaccination

मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षांपुढील स्त्री-पुरुष लस घेऊ शकतात. दुसरा डोस घेण्यासाठी लसीचा प्रकारानुसार किमान पहिला डोस घेतल्यापासून नियमानुसार कालावधी पूर्ण असावा. लाभार्थ्याने पहिला डोस Covishield किंवा Covaxin जो घेतला असेल तोच दुसरा डोस खात्री करून घ्यावा. लस घेण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर आयडी, मोबाईल नंबर ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. लसीकरण करण्यापूर्वी जेवण करून येणे आवश्यक आहे. लसीकरण झाल्यानंतर लसीकरण केंद्र डॉक्टरांच्या निगराणी खाली किमान अर्धा तास थांबावे.

जाणून घ्या लसीकरण का महत्त्वाचे/फायदे

1) तज्ञांच्या मतानुसार लसीकरणाचे दोन डोस घेणाऱ्या व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे.
2) कोरणा विरुद्ध लढाईमध्ये लसीकरणामुळे रोग प्रतिकारशक्ती अतिशय चांगली वाढते.
3) कोरोणा च्या तिसऱ्या लाटेला आपल्या कुटुंबा पर्यंत पोहोचू न देण्यासाठी लस अत्यंत आवश्यक आहे.
4)लसीकरण याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्हाला संसर्ग झाला नसेल तर या आजाराची लढण्यासाठी तुमच्यात आधीची प्रतिकारशक्ती वाढेल.
5) लसीकरणानंतर किमान 6 ते 8 महिने आपल्यात प्रतीपिंड असतील.
6) सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर ती बुस्टर सारखे कार्य करेल.
7) डबल डोज कशाला? आपल्याला माहिती म्हणून सांगू इच्छितो की हे बूस्टर डोज म्हणून कार्य करते त्यामुळे दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे.
8) जर तुम्हाला लस मिळाली तर सर्वात मोठा फायदा म्हणजे रूग्णालयात जाणे टाळणे.

याकडे सरकारी मोहीम म्हणून न बघता सामाजिक कर्तव्य म्हणून बघणे गरजेचे आहे याबाबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचणे हो या बाबतची जागृती करणे आवश्यक आहे हे मान्य आहे की आपल्या मागे अनेक कामे आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आपल्या आयुष्य आहे आणि ते अनमोल आहे. पुन्हा लॉक डाउन नको असेल तर आपल्या सर्वांकडून जास्तीत जास्त बळ प्रदान व्हावे ही अपेक्षासह या मोहिमेत सहभागी व्हा.

चला आजच लसीकरण करून घेऊया,कोरोणाला हरवूया…………..

Leave a Comment

x