महिला समृद्धी कर्ज योजना Mahila Samruddhi Karj Yojana

महिला समृद्धी कर्ज योजना

महिला व्यवसायांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबवले जात आहे.

महिला समृद्धी कर्ज योजना Mahila Samruddhi Karj Yojana

या योजने अंतर्गत महिला व्यवसायकाना तसेच समाजातील उपेक्षित घटकांतील महिला मागासवर्गीय यांना आर्थिक मदत दिली जाते. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांचे सामाजिक आर्थिक स्थिती उन्नत करण्याच्या उद्देशाने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिला समृद्धी योजनेअंतर्गत लागू केलेल्या कर्जापैकी 95 टक्के कर्ज दिले जाईल आणि उर्वरित 5 टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी किंवा स्वतःलाभार्थी देणार आहे.कर्जाच्या वितरणाच्या तारखेपासून घेतलेला कर्जाचा उपयोग कालावधी चार महिन्यांच्या आत करावा.

महिला समृद्धि कर्ज योजना पात्रता

1 योजना हे समाजातील उपेक्षित महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने असल्याने कर्जाचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी पात्रतेच्या कठोर अटी आहेत.

2 लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे

3 बचत कर्ज गट आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजक या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

4 महिला लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावे.

5 अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न हा ग्रामीण भागासाठी 98 हजार पर्यंत असावे व शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे एक लाख वीस हजार पर्यंत असावे.

6 कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये

आवश्यक कागदपत्रे

अर्ज,जात प्रमाणपत्र, बँक खाते,उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा,ओळख पुरावा, मतदार ओळखपत्र ,सेल्फ ग्रुप मेंबर्शिप आयडी कार्ड

लाभार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्ज सोबतच सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे लागतील. व्याजाचा दर 4 टक्के असेल परतफेडीचा कालावधी तीन वर्षे असेल बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करण्यात येईल. प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाख रुपये पर्यंत बचत गटातील 20 सदस्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये चा लाभ मिळेल.

Leave a Comment

x