महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,mahatma jyotirao fule janaarogy yojna

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना

केंद्र सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे केले आहे. या योजनेद्वारे राज्यातील पात्र नागरिकांना सुचिबद्ध रूग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी येणे वेळी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागते. ही धावपळ होऊ नये आणि योजनेचा लाभ व्हावा म्हणून आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

योजनेचा उद्देश

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेज साठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने सह एकत्रितपणे राबविले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते.मूत्रपिंडाचा प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाख रुपये आहे.

योजनेचा लाभ कुणाला?

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केसरी शिधा पत्रिका धाराक कुटुंबातील नागरिक तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबात देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे, हे सुद्धा या योजनेचे लाभार्थी आहेत.

लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करावी

महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णालयात असणाऱ्या आरोग्य मित्रांची मदत घेता येते. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र उपलब्ध आहेत. आरोग्यमित्र रुग्णाची योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करतात तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ते सहाय्य व मदत करतात.रुग्णांची नोंदणी आरोग्यमित्र मार्फत केले जाते. रुग्णाना नोंदणीच्या वेळी रुग्णाच्या नावाचे पडताळणी तसेच ओळखपत्र पाहून केले जाते. ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार या कागदपत्रांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळते.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो

महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र असंघटित कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि सातबारा उतारा आवश्यक असतो. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी 34 निवडणूक विशेष सेवा अंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात.

Leave a Comment

x