महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Fule Janaarogy Yojana

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दिनांक 1 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू झाली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotirao Fule Janaarogy Yojana

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून या योजनेचा लाभ कोणत्याही प्रकारचे रेशनकार्ड असणारे नागरिक घेऊ शकतात. तसेच कोणतेही नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेले शेतकरी सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांचे आर्थिक समर्थन हे अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब लोकांसाठी शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण थेरपी सारख्या महागड्या आरोग्य सेवा सुद्धा या योजनेअंतर्गत पुरवल्या जात आहेत. ह्या सर्व आजारांसाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालय निवडले गेलेले आहेत तसेच खासगी रुग्णालयांचा सुद्धा समावेश आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे आहे. या योजनेतील अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एका लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक या योजनेस पात्र आहेत. कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेले म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील रहिवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावे लागले लागेल. त्यानंतर गावातील उमेदवारांसाठी त्यांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन त्यांचा आजार तपासून घ्यावे लागेल. त्यानंतर अर्जदारास त्यांच्या आजाराची तपासणी हे तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावे लागेल. आजाराची खात्री झाल्यास रोगाचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्रांना कळून नोंदविला जाईल. तसेच आजाराचा त्रास रुग्णालय व डॉक्टरांचा खर्च या योजनेच्या पोर्टल वर ऑनलाइन दाखल केल्या जाईल हे प्रक्रिया 24 तासाच्या आत पूर्ण होईल. त्यानंतर रुग्णावर उपचार सुरू केले जातात आणि उपचारादरम्यान कोणताही उपचार संबंधित खर्च रुग्णाकडून केला जात नाही या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति वर्ष दीड लाखापर्यंत चे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण मर्यादा प्रतिवर्ष अडीच लाखापर्यंत आहे. ह्या योजने अंतर्गत विशेष सेवा अंतर्गत 771 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश असणार आहे.

अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी, उपचार तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राचे नियुक्ती करण्यात आलेली आहेत. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र हे उपलब्ध आहेत.आरोग्य मित्र यांच्याकडून आरोग्य कार्ड काढून मिळेल.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
1 आधार कार्ड
2 रेशन कार्ड
3 सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या आजाराचे प्रमाणपत्र
4 अर्जदाराची तीन पासपोर्ट आकाराचे फोटो
5 उत्पन्नाचे प्रमाणपत्र

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट उपचार

सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया,नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्तिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया, पोट व जठार शस्त्रक्रिया,बालरोग शस्त्रक्रिया, प्रजनन व शस्त्रक्रिया मज्जातंतू विकृती शास्त्र, करकरोग शस्त्रक्रिया,वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडिओथेरपी कर्करोग, त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, पॉली ट्रामा प्रोस्थेसिस जोखमी देख बाल, जनरल मेडिसिन संसर्गजन्य रोग, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, हृदयरोग,नेफरोलॉजी, न्यूरोलॉजी,चर्मरोग चिकित्सा चर्म रोग चिकित्सा रोमोटोलॉजी, इंटरवेशनल रेडिओलॉजी.

Leave a Comment

x