महाराष्ट्र बांधकाम विभाग विभागात 2776 पदांची मेगा भरती लवकरच Maharashtra PWD recruitment 2022

महाराष्ट्र बांधकाम विभाग विभागात 2776 पदांची मेगा भरती लवकरच

महत्वाची बातमी म्हणजे राज्याच्या बांधकाम विभागामध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे.

महाराष्ट्र बांधकाम विभाग विभागात 2776 पदांची मेगा भरती लवकरच Maharashtra PWD recruitment 2022

राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील(PWD) शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी-2 व कनिष्ठ अभियंत्यांची 1240 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची 1536 पदे भरणे आवश्यक आहे. या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीचे कारवाई करणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

राज्यमंत्री श्री भरणे म्हणाले की राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागात(PWD) सहाय्यक अभियंता श्रेणी-2 कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर मोठा परिणाम होत आहे. कमी मनुष्यबळात काम करणे कठीन आहे.बांधकाम विभागाची परिस्थिती लक्षात घेता राज्यातील पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी बांधकाम विभागाने आकृतीबंध तयार केला असून वित्त विभागाला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. याला मान्यता मिळताच तात्काळ पद भरती होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली.

राज्यमंत्री भरणे म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विभाग निहाय रिक्त पदांची अद्यावत माहिती द्यावी. बढती ची देखील कारवाई करण्यात येणार आहे. मात्र बदलीचे आदेश निघू न ही काही अभियंता नियुक्त ठिकाणी हजर झाले नाहीत. बदलीच्या कार्यादेश मिळूनही विहित कालावधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास अभियंत्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी या बैठकीत दिले आहेत लवकरच मेगा भरती करण्यात येणार आहे.

Leave a Comment

x