राज्याच्या पोलीस दलात 50 हजार पदांची मेघाभरती Maharashtra police megabharti

राज्याच्या पोलीस दलात 50 हजार पदांची मेघाभरती

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राज्याचे पोलिस दल अधिक बळकट करण्यासाठी 50 हजार पदांची भरती करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली

राज्याच्या पोलीस दलात 50 हजार पदांची मेघाभरती Maharashtra police megabharti

राज्यामध्ये पोलिसांची कमतरता भासत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस भरती करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पोलीस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्ताव वरील चर्चेला उत्तर देताना माननीय दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केले. अशाच प्रकारचे घोषणा आर आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी दहा हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. मात्र आता उर्वरित पन्नास हजार पोलिसांची भरती करावयाची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या कायदा सुव्यवस्था बिघडली आहे भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचारांची मध्ये वाढ झालेली आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर देतांना महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली झाल्याची कबुली दिली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा केला आहे. त्यातील फाशीच्या शिक्षेबाबत वेगवेगळी मते आहेत. परंतु सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून अत्यंत घृणास्पद कृत्य त्यासाठीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग म्हाडा, शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी पूर्ण लक्ष घालून कारवाई केलेली आहे.या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत थांबणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला. तसेच राज्याच्या पोलिस भरतीमध्ये गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.पोलीस भरती लवकरच होणार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.अनेक तरुण वर्षोनुवर्षे पोलिस भरती ची तयारी करत आहे आता पोलिस भरती होणार त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सकता लागली आहे ती म्हणजे पोलिस भर्ती ची.

See also  खाते रिकामे होऊ शकते जर तुम्ही एटीएममधून पैसे काढताना हिरव्या लाईट लक्ष दिले नाही तर safe atm transaction

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x