Maharashtra Cabinet Decision यंदा लाखो कुटुंबाची दिवाळी होणार गोड

Maharashtra Cabinet Decision यंदा लाखो कुटुंबीयांची दिवाळी होणार गोड

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 270 रुपयांचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

याचा शहर व जिल्ह्यातील नऊ लाख 16 हजार 371 कुटुंबीयांना लाभ होणार आहे.यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा,चनाडाळ साखर प्रत्येकी एक किलो, एक लिटर पान तेल मिळेल.

जिल्ह्यातील पाच लाख 37 हजार कुटुंबियांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे हा संच एका महिन्याच्या कालावधी करता देण्यात येऊन त्याच्या वितरण इ पोस प्रणालीदारी करण्यात येईल. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख पंच्याऐंशी हजार 454 तर शहरातील तीन लाख तीस हजार 917 अशा एकूण नऊ लाख 16 हजार 371 कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे.

Maharashtra Cabinet Decision

यासाठी राज्य सरकारकडून टेंडर करण्यात येणार असून त्यांच्याकडूनही या चारही वस्तूंचे स्वतंत्र पॅकेट तयार करून घेतले जाणार आहे नंतर हा एकत्रित माल जिल्हा पुरवठा अधिकारी व अण्णधान्य वितरण विभागाच्या गोडाऊन मध्ये आणण्यात येईल. हे पॅकेट नंतर रेशन दुकानदारापर्यंत रेशन कार्डधारकांना देण्यात येणार आहे. प्रत्येक रेशन कार्ड वर एक पॅकेट याप्रमाणे त्याचे वितरण करण्यात येईल.  बाजारभावानुसार सध्या साखर 38 रुपयाच्या चनादाळ 84 रुपये रवा 45 रुपये आणि पामतेलं शंभर रुपयांना मिळते. याचा अर्थ 267 ते 270 रुपयांचे पॅकेट राज्य सरकारकडून केवळ शंभर रुपयात मिळणार आहे.

Leave a Comment

x