ब्रेकिंग 40 हजार शिक्षकांची भरती परीक्षेचा कालावधी ठरला Maha TET

ब्रेकिंग 40 हजार शिक्षकांची भरती परीक्षेचा कालावधी ठरला

तब्बल दोन वर्षानंतर अखेर राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता (Maha TET) ही 15 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षानंतर घेण्यात येत आहे.

ब्रेकिंग 40 हजार शिक्षकांची भरती परीक्षेचा कालावधी ठरला Maha TET

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

साधारणपणे टीइटी परीक्षेचे दोन पेपर असतात. त्यामध्ये पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील सुमारे 6100 शिक्षक सेवकांच्या पदभरती चा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार आणि महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांनी भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे अशी माहिती दिली होती.

राज्य सरकारच्या त्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी, अनुदानित अंशत अनुदानित व विनाअनुदानित अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील डी एल एड कॉलेज शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

x