एलपीजी सबसिडी मिळत नसेल तर घरच्या घरी हे काम करा LPG Gas Cylender Subsidy

एलपीजी सबसिडी मिळत नसेल तर घरच्या घरी हे काम करा

एलपीजी सिलेंडर दिवसेंदिवस महाग होत आहे अश्या वेळेस सबसिडीमुळे सामान्य लोकांना सिलेंडरच्या महागाईतून थोडासा दिलासा मिळत असतो.पण एलपीजी सिलेंडर खरेदी करून सरकारकडून जर आपल्याला सबसिडी आली नसेल तर आपण घर बसल्या हे काम करू शकतो.

एलपीजी सबसिडी मिळत नसेल तर घरच्या घरी हे काम करा LPG Gas Cylender Subsidy

जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर याचे अनेक कारणे असू शकतात तुम्ही त्या नियमात बसत आहात किंवा नाही. सरकार अनेक लोकांना एलपीजी सिलेंडर वर सबसिडी देत नाही याचे कारण तुमचे आधार लिंक नसलेली असू शकते आणि दुसरे म्हणजे ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न हे दहा लाख रूपये पेक्षा अधिक आहे त्यांना सुद्धा सबसिडी मिळत नाही. सुरुवातीला सबसिडीची रक्कम ही दोनशे रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला मिळत असे. परंतु दिवसेंदिवस घरगुती गॅसवरील सबसिडी खूपच कमी झाली आहे. पण ही सबसिडी आपल्याला मिळते किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर घरच्या घरी ऑनलाईन ही सोपी पद्धत अवलंब करू शकता. म्हणजेच आपल्याला सबसिडी बद्दल ऑनलाईन माहिती घरच्याघरी मिळू शकते जाणून घ्या आपल्याला काय करायचे आहे.

सर्वप्रथम www.mylpg.in या वेबसाईटला भेट द्या. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला काही कंपन्यांच्या गॅस सिलेंडर चा फोटो दिसेल. तुमचा सेवा पोर्ट पुरवठादार कोणताही असला तरी गॅस सिलेंडर च्या फोटो वर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुमच्या गॅस सेवा पुरवठा ची माहिती असेल. वर उजव्या बाजुला बाजूला साइन इन आणि नवीन वापर करण्याचा पर्याय असेल तो निवडा. जर तुमचा आयडी आधीच तयार झाला असेल तर तुम्हाला साईन इन करावा लागेल. जर आयडी नसेल तर तुम्हाला नवीन युजर निवडावा लागेल यानंतर उघडणाऱ्या विंडोजमध्ये उजव्या बाजूला व्ह्यू सिलेंडर बुकींग हिस्टरीचा पर्याय असेल तो तुम्ही निवडायचा आहे. तुम्हाला सबसिडी मिळत आहे किंवा नाही हे तुम्हाला यावरून कळेल सबसिडी मिळत नसल्यास तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा तक्रार करू शकता.

Leave a Comment

x