आता शेतजमीन मोजणी होणार 30 मिनिटात
महाराष्ट्र भूमिअभिलेख (Bhumi Abhilekh) विभागात रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरात जमिनींची मोजणी करणार आहे. या मशीनद्वारे एक हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ 30 मिनिटात होते असा भुमिअभिलेख विभागाचा दावा आहे.
आता शेतजमीन मोजणी होणार 30 मिनिटात Land Counting
नेमके हे रोव्हर मशीन आहे तरी काय? हे आपण बघूया. ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणी च्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धती पेक्षा वेगळे कसे आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रामध्ये सध्या 77 ठिकाणी cors कोर्स स्थापन केलेले आहेत याचा संपर्क थेट उपग्रह शी आहे आणि रोव्हर एक सुद्धा मोविंग ऑब्जेक्ट आहे जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो. त्याचे कनेक्शन सॅटॅलाइट शी आहे त्यामुळे कुठे सुद्धा गेला तर ते रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाचे जास्तीत जास्त अचूकता दर्शवते.ते बरोबर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी घेऊन जाऊ शकता.
पूर्वी प्लेन टेबल किंवा एटीएस मशिनच्या साह्याने जमीन मोजणी (Land Counting)केली जायची शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल तर त्याच्या सोबत चालत चालतच बरोबर त्या ठिकाणची रीडिंग एका मिनिटात घेतो. जोपर्यंत आपल्या क्षेत्रात फिरून होतो तोपर्यंत क्षेत्राची रोव्हर द्वारे पूर्ण मोजणी होते. एटीएस मशीन ला अर्धा दिवस लागायचा आता रोव्हर द्वारे एक हेक्टर क्षेत्रावर ची मोजणी अर्धा तासात होते. टेबल प्रक्रिया करताना आपल्याला प्रत्येक 200 मीटर वर टेबल लावावा लागायचा उंच झाडाचे निरीक्षण घेता यायचं नाही. झाडांच्या फांद्या तोडाव्या लागायच्या उंच गवत असेल तर मोजणी होऊ शकत नव्हती ईटीएस मशिन साडे चार फुटावर लावत असल्यामुळे त्या पेक्षा जास्त उंचीची झाडं असली की अडथळा यायचा. रोव्हर मध्ये रेडींग सॅटेलाईट कळून येत असल्यामुळे परिसर ओपन टू स्काय असेल तर तुम्ही ऑब्झर वेशन घेऊ शकता ही मोजणी तात्काळ होते यातले ॲक्युरॅसी मशीन मधून पाहून आम्ही खात्री करू शकतो.आपल्याला अगदी पाच सेंटीमीटर च्या अचूक मोजणी करता येते. शेतीची मोजणी रोव्हर वापरून म केली जाणार आहे त्याचे अक्षांश-रेखांश आपल्याला मिळणार आहेत ते कायमस्वरूपी जतन केले जाणार आहेत. भूकंप झाला पूर आला दगड खुणा वाहून गेले तरी आमच्याकडे अक्षांश-रेखांश असल्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या हद्दी च्या साह्याने दाखवू शकतो अतिक्रमण कारताना लोक बांध करतात त्यामुळे जमीन समोरच्याची जास्त असल्याचा भास होतो अक्षांश-रेखांश मुळे बांध कोरणारे उघडे पडतील आणि या पद्धतीने मोजणी करून घेतली तर समोरच्याला किती बांध कोरला हे स्पष्ट होईल पुढच्या दोन वर्षात प्रत्येक सर्वेअर कडे रोव्हर मशीन देण्याचा आमचा उद्दिष्ट आहे त्यानंतर राज्यातील कोणतीही मोजणी रोव्हर च्या साह्याने करता येईल किंवा इटीएस मशीन रोव्हर मध्ये रूपांतर करून ती करता येईल.