पोस्टाच्या या योजनेत सरकारी हमीसह पैसे दुप्पट करा kisan vikas patra

पोस्टाच्या या योजनेत सरकारी हमीसह पैसे दुप्पट करा

पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र(kisan vikas patra) ही एक उत्तम बचत प्रमाणपत्र योजना आहे. 1988 मध्ये इंडिया पोस्टने याची सुरुवात केली होती.

पोस्टाच्या या योजनेत सरकारी हमीसह पैसे दुप्पट करा kisan vikas patra

किसान विकास पत्र(kisan vikas patra) हा लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम आहे. किसान विकास पत्र योजनेत तुमचे पैसे 10 वर्ष चार महिन्यात दुप्पट होतील. किसान विकास पत्र गुंतवणुकदारांना मुदतपूर्ती पूर्वी बाहेर पडण्याचे परवानगी देते आणि तरीही उच्च परतावा मिळतो. यावरील व्याजदर 6.9 टक्के आहे चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजनेतील हमीचा तुमचे पैसे 124 महिन्यात दुप्पट होतील.

या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकता आणि कमाल मर्यादा नाही तुमचे वय 18 किंवा त्याहून अधिक असल्यास तुम्ही एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता. गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या खात्यातून अडीच वर्षे पैसे काढू शकणार नाही.किसान विकास पत्र(kvp) वर आयकर सूट देखील आहे. प्रौढ स्वतःसाठी किसान विकास पत्र प्रमाणपत्रे खरेदी करू शकतात आणि ते अल्पवयीन मुलांसाठी प्रमाणपत्रे खरेदी करू शकतात शिवाय ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तसेच एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. पोस्ट ऑफिस(post office) चे नियम खरेदीच्या अडीच वर्षानंतर किसान विकास पत्र चे पुढचा करण्याची परवानगी देते. किसान विकास पत्र ऑनलाईन योजनेत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे. पोस्ट ऑफिस मधून अर्जाचा फॉर्म गोळा करा सर्व आवश्यक माहिती चा फॉर्म भरा आणि पोस्ट ऑफिस मध्ये परत सबमिट करा. फॉर्म ऑनलाइन डाऊनलोड करता येते आणि भरून सबमिट सुद्धा केला जाऊ शकतो.

नो यू अर कस्टमर(kyc) प्रक्रियासाठी तुमच्या ओळखीचा पुरावा प्रत प्रधान करणे आवश्यक आहे.तुम्ही आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्होटर आयडी कार्ड पॅन कार्ड,आधार कार्ड वापरु शकता तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर आणि संबंधित ठेव रक्कम भरल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्र प्रमाणपत्र दिले जाईल.तुम्ही ई-मेलद्वारे हे प्रमाणपत्र प्राप्त देखील करू शकता अशा परिस्थितीत प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ईमेल केले जाईल.

Leave a Comment

x