किसान क्रेडिट कार्ड काढायचे तरी कसे जाणून घ्या प्रक्रिया Kisan Credit Card

किसान क्रेडिट कार्ड काढायचे तरी कसे जाणून घ्या प्रक्रिया

बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असतील पण ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँकची फी रद्द करण्यात आली आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान निधी ला जोडण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्ड काढायचे तरी कसे जाणून घ्या प्रक्रिया Kisan Credit Card

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी केली असून शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. वर्षभरातच त्याची परतफेड करावी लागते. पी एम किसान वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

किसान क्रेडिट कार्ड साठी महत्वाची कागदपत्रे

1)आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ साठी पॅन कार्ड, आधार कार्ड,मतदार ओळखपत्र,ड्रायव्हिंग लायसन असावेत.
2) अर्जासोबत पासपोर्ट फोटो

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवणार

केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या जाच्यापासून सोडविण्यासाठी आणि शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ची योजना. किसान क्रेडिट कार्ड ला अर्ज करण्यासाठी पी एम किसान सन्मान योजना च्या वेबसाईट वर जा.तिथे तुमच्या जमिनीची माहिती पिकाची माहिती, आणि पूर्वी कर्ज घेतले असल्यास सांगा. केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.

किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते

शेतीशी जोडलेले कोणतीही व्यक्ती जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तो केसीसी बनवू शकतो. कर्जाची मुदत संपेपर्यंत के सी सी साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x