कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Karmveer Dadasaheb Gaykwad Sablikaran Yojana

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

महाराष्ट्र राज्य द्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Karmveer Dadasaheb Gaykwad Sablikaran Yojana

भूमिहीन योजना अंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती व प्रवर्गातील कुटुंबाचे पती-पत्नीच्या नावे केली जाते मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन आणि दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात राज्य सरकारकडून देण्यात येते.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना चा लाभ घेण्यासाठी पात्रता
1 लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची किमान वय 18 वर्षे व कमाल वय 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
2 अर्जदाराकडे जमीन नसावी तसेच दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा परित्यक्ता विधवा स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येईल.
3 महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंग जमिनीचे वाटप केले आहेत या कुटुंबांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4 यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही किंवा विकता येत नाही
5 लाभार्थ्यांना देण्यात येणारे कर्ज हे बिन व्याजी असेल आणि त्याचे मुद्त दहा वर्ष असणार आहे कर्जफेडीची सुरुवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षानंतर सुरू होणार आहे.
6 कुटुंबाने दहा वर्षाच्या आत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
7 संबंधित लाभधारकांनी जमीन स्वतः करणे आवश्यक असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक आहे

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो,अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, रहिवासी दाखला,रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स,निवडणूक कार्ड प्रत भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचा तहसीलदार याचा दाखला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचे वय 60 वर्षाच्या खाली असेल तर त्यांनी वयाचा पुरावा द्यावा लागेल अर्जदार हा दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा विविध प्रमाणपत्र शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्याच्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र

सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रकिया सुरू करण्यात आलेले आलेले नाही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना पीडीएफ अशा अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात सादर करावा. लागेल

Leave a Comment

x