मोड आलेले कडधान्ये का खावीत? कोणती कडधान्ये खावीत?Kaddhanye

मोड आलेले कडधान्य का खावीत?कोणते कडधान्य खावीत?

Kaddhanye कडधान्ये मोड आणून खाण्याची पद्धत खरोखरच आरोग्यदायी आहे. कडधान्यांना मोड आणण्याच्या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे कडधान्य आठ ते दहा तास पाण्यात भिजवून त्याला सुती कापडामध्ये पुन्हा आठ तास बांधून ठेवल्यास चांगले मोड आणता येते. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्व मध्ये दुप्पट तिप्पट वाढ होते. चला तर जाणून घेऊया.

मोड आलेले कडधान्ये का खावीत? कोणती कडधान्ये खावीत?Kaddhanye

मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे

1) कडधान्याला मोड आणल्याने त्यातील प्रथिने पचायला सोपी होतात. मोड काढण्यापूर्वी कडधान्यांमध्ये जीवनसत्व क नाहीसा प्रमाणात हेच प्रमाण मोडआल्यानंतर मला भरपूर प्रमाणात वाढू शकते.
२)मोड आनल्यामुळे कडधान्याचा वातूळ पणा कमी होतो. सर्व जीवनसत्वाची अनेक पटीने वाढ होते.मोड येण्याच्या प्रक्रियेत तरफलामध्ये असलेले टॅनिन आणि फायटिक ऑसिड याचे निरुपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोह आणि कॅल्शियमच्या शोषण वाढते याचा शरीराला चांगला फायदा होतो.
3) मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये कडधान्य हलक्या होतात आणि पचायला सुलभ होतात त्याच प्रमाणात वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतात कारण त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी होऊन रेषा युक्त पदार्थांची वाढ होते.
4) मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये कर्बोदकांचे पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते यातील कर्बोदकांचे पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिने पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने खनिजे जीवनसत्त्वे आणि कार्बोदके यांचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्य.

कोणते कडधान्य खावीत?

सर्वात प्रकारचे कडधान्य पचायला सारखे नसतात.पचायला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी,मुंग,चवडी.हरभरा हे पचायला जड असते. कडधान्यात भरपूर पोषक तत्वे असतात 100 ग्रॅम कडधान्यांमध्ये जवळपास 17 ते 25 टक्के पर्यंत प्रथिने असतात त्याला अपवाद सोयाबीन आहे. 100 ग्राम सोयाबीन मध्ये 43 टक्के प्रथिने असतात.

Leave a Comment

x