खुशखबर जनधन खाते धारकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये Jandhan yojana

खुशखबर जनधन खाते धारकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये

केंद्र सरकारकडून जनधन खात्याची योजना(Jandhan yojana) सुरू करण्यात आली आहे. तुम्हीपण जनधन खात्याचे अकाउंट सुरू केले असेल तर या सरकारी योजनेचा अगदी सहज लाभ घेऊ शकता.

खुशखबर जनधन खाते धारकांना दरमहा मिळणार तीन हजार रुपये Jandhan yojana

कोणत्याही योजना अंतर्गत सरकार थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा करते त्या सर्व योजनांचे पैसे प्रथम जनधन खात्यात ट्रान्सफर केले जातात. सरकार जनधन खाते धारकांना दरमहा तीन हजार रुपये ट्रान्सफर करते. या सरकारी योजनेचे नाव आहे “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना”(Pradhanmantri shram yogi mandhan yojana) या योजने अंतर्गत मिळणारे पैसे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात.

जनधन खाते धारकाला या योजनेचा लाभ मिळतो केंद्र सरकारच्या मानधन योजना 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणतेही व्यक्ती सहभागी यामध्ये होऊ शकते. या खात्यात धारकांना वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. जेव्हा एखादी व्यक्ती साठ वर्षाचे होते तेव्हा या योजनेचे पैसे त्यांच्याकडे ट्रान्सफर केले जातात. त्यामध्ये वर्षाला 36 हजार रुपये ट्रान्सफर होतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ होतो. पथ विक्रेते,मधन्य भोजन कामगार हेड लोडर, वीटभट्टी कामगार,घरगुती कामगार धोबी,रिक्षाचालक भूमीहीन मजूर इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुमचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड(Aadhar card) असणे आवश्यक आहे याशिवाय तुमचे जनधन खाते देखील असणे आवश्यक आहे तुम्हाला अकाउंट डिटेल सुद्धा सबमिट करावे लागतील या योजने अंतर्गत वेगवेगळ्या वयोगटानुसार दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये योगदान द्यावे लागेल जर तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेत सामील झाला तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील तीस वर्षाच्या व्यक्तींना 100 आणि चाळीस वर्षाच्या व्यक्तींना दोनशे रुपये भरावे लागतील.

नोंदणी कशी करावी?

या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एखाद्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रामध्ये म्हणजेच सीएससी CSC कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावे लागेल पासबुक चेक बुक किंवा बँक स्टेटमेंट पूर्व म्हणून दाखवता येईल. तुमचा तपशील कम्प्युटरमध्ये टाकतात तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम्योगी कार्ड मिळेल केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकतो.

Leave a Comment

x