21 जून जागतिक योग दिन 2021 International Yoga Day

21 जून जागतिक योग दिन 2021

आज 21 जून म्हणजे जागतिक योग दिन. 11 डिसेंबर 2014 ला 193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला साजरा करण्याची परवानगी दिली. भारतात 21 जून 2015 ला पहिला योग दिन साजरा केला गेला. यावर्षीचे जागतिक योग दिनाची थीम आहे “योग फोर वेलनेस” 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊ या जागतिक योग दिनाबद्दल.

21 जून जागतिक योग दिन 2021 International Yoga Day

जागतिक योग दिन हा 21 जुनलाच का?

जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा करण्या मागे वैज्ञानिक आणि पारंपारिक अशी दोन ही कारणे आहेत. जून महिन्याच्या 21 तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो. उत्तरायन मधील सर्वात मोठा दिवस. सूर्यप्रकाश,उष्णता जास्त असते. म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. जेव्हा दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश व उष्णता कमी होते व वातावरणात बदल होतो. वातावरणातील या बदलामुळे आजाराचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते.

योगा का करावा?

रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस. International Yoga Day निरोगी आयुष्यासाठी डॉक्टर सुद्धा योगासने करण्यास सांगतात. योग हे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे. नियमित योग करून आपण आपले शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो.नियमित योग केल्याने आपले शरीर निर्विकार बनते. मन शुद्ध होते.नकारात्मक ऊर्जा जाऊन विचारांमध्ये सकारात्मकता येते,म्हणून आपण योग करावा. योग हा व्यायाम आणि ध्यान करण्याचा एक प्रकार आहे. याचा मूळ उद्देश आपल्याला आपल्या शरीराच्या मूळ तत्त्वांशी जोडणे असा आहे. शरीर हीच खरी संपत्ती आणि ती टिकविण्यासाठी योग हा करायलाच पाहिजे नियमित योगा चा सराव करा आणि निरोगी आयुष्य जगा.योग असे जेथे आरोग्य वसे तेथे.

See also  जागतिक महिला दिन, women's day

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x