आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर तक्रार कोणाकडे करणार Insurance Claim

आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर तक्रार कोणाकडे करणार

आरोग्याच्या समस्या वाढतच आहे. चांगला आरोग्य राहण्यासाठी आपण विविध उपाय करतो.आजार झाल्यावर खर्च खुप होऊ नये, त्यावर एक पर्याय म्हणून आरोग्य विमा आपण काढतो.

आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर तक्रार कोणाकडे करणार Insurance Claim

कोरोना महामारी च्या काळात अनेक लोकांनी आपले विमा काढून घेतले आहेत. तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल आणि वेळोवेळी प्रीमियम भरत असाल परंतु नंतर तुम्हाला क्लेम मिळाला नसेल तर तुम्ही आता तक्रार सुद्धा करू शकता. बऱ्याच वेळा आरोग्य विमा क्लेम मिळत नाही. कोरोना महामारी च्या काळात अनेक प्रकरणे समोर आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी रुग्णांचे क्लेम वेळेवर नाकारले आहेत. बऱ्याच वेळा इतर कारणे दाखवून आरोग्य विमा कंपन्या क्लेम नाकारतात.

आरोग्य विमा काढल्यानंतर विम्याची रक्कम 30 दिवसाच्या आत मिळणे आवश्यक आहे.जर असे झाले नाही तर कंपनीने युक्तिवाद करून तुमचा क्लेम फेटाळला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. तुमचा आरोग्य विमा क्लेम नाकारला असेल तर तुम्ही लोकपालाकडे तक्रार करू शकता. गेल्या काही काळापासून हॉस्पिटलायझेशन आवश्यक नसल्याचे सांगून क्लेम नाकारण्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.आरोग्य विम्याच्या वापरा दरम्यान प्रथम थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन ला माहिती द्यावी लागते.थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन ग्राहक व कंपनी यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते त्यांचा मुख्य उद्देश दावा आणि सेटलमेंट प्रक्रियेत मदत करणे आहे.

Leave a Comment

x