आयटी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी इन्फोसिस मध्ये 55 हजार पदांची नोकरभरती Infosys job

आयटी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी इन्फोसिस मध्ये 55 हजार पदांची नोकरभरती

कोरोणाच्या संकट काळात अनेक नोकऱ्या कमी होत आहे.प्रत्येक कर्मचारी आपली नोकरी टिकविण्यासाठी धडपड करत आहे.

आयटी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी इन्फोसिस मध्ये 55 हजार पदांची नोकरभरती Infosys job

कोरोना काळात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. परंतु माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील कंपन्या यशस्वी घोडधोड करायला पाहायला मिळत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी (IT)कंपन्या आपल्याकडील अनेक विविध पदांची भरती करण्यास तयार आहेत. कोरोना च्या दुसऱ्या लाटांच्या तडाख्याने देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. आता आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने(Infosys) 55 हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे.

आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इनन्फोसिस कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की देशातील प्रतिभा आणि कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. तसेच आणखी उत्तम करण्यासाठी कंपनीने गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी 55000 किंवा त्यापेक्षाही अधिक भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इन्फोसिस या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 मध्ये इन्फोसिस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अडीच लाख होती ती वाढवून आता 2021 मध्ये दोन लाख 92 हजार इतकी झाली आहे.त्यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या 39.6 टक्के आहे याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे दुसरीकडे टीसीएस(TCS) इन्फोसिस(Infosys) आणि विप्रो(WIPRO) यासारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केलेले आहेत.2021 मध्ये या कंपन्यांना प्रचंड फायदा झाला असल्याचे सांगितले जात आहे. इन्फोसिस चा नफा पाच हजार 197 कोटी वरून आता पाच हजार 809 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इन्फोसिसने अशा प्रकारची भरती केल्यास पंचावन्न हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रामध्ये सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.महिलांची संख्या बघता महिला वर्गाला सुवर्ण संधी इन्फोसिस देत आहे.

Leave a Comment

x