चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे how to money back process

चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे

आजकाल आपण ऑनलाईन(online) व्यवहारालाच प्राधान्य देतो. अनेकदा ऑनलाइन व्यवहार मध्ये चुकून दुसऱ्या खात्यात पैसे जाऊ शकतात. अशावेळी परत पैसे मिळवण्यासाठी आणि ते कसे मिळवावे याची माहिती जाणून घेऊया.

चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे how to money back process

आता एका बँकेतून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे. फोन पे(phone pay) गुगल पे (google pay)ऍमेझॉन पे amazon pay)आणि इंटरनेट बँकिंग(internet banking) सारख्या अनेक पेमेंटअप मुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर(transfer) करताना चुकून बँक खाते क्रमांक चुकीचा टाकला गेल्याने रक्कम दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर होते. असे जर आपल्या सोबत होत असेल तर काय काय करावे.

जर चुकून जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर प्रथम तुम्हाला बँकेला फोन किंवा इमेल द्वारे याबद्दल माहिती द्यावी लागेल. लवकरात लवकर शाखा व्यवस्थापक यांची जर भेट घेतली तर फार उत्तम होईल. ज्या बँकेच्या खात्यात तुम्ही पैसे ट्रान्सफर केले आहेत तीच बँक हे समस्या सोडवू शकते. चुकून जर व्यवहार झाला असेल तर तुमच्या बँकेला पूर्णपणे तपशील, माहिती द्या. व्यवहाराची तारीख,वेळ तुमच्या खाते क्रमांक आणि चुकून पैसे हस्तांतरित केलेले खाते क्रमांक इत्यादी ची माहिती द्यावी लागेल. तुम्ही ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील ते खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा आयएफसी(IFSC) कोड चुकीचा असेल तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात येतील, पण तसेच झाले नसल्यास तुमच्या बँक शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला या चुकीच्या व्यवहार बद्दल सांगा. कोणत्या बँक खात्यात पैसे गेले आहे ते शोधण्याचा प्रथम प्रयत्न करा. चुकून जर दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास पैसे परत मिळणार जास्त वेळ लागू शकतो.

काहीवेळा बँकांना असे प्रकार व प्रकरणे निकाली काढण्यासाठी दोन महिने पर्यंतचा कालावधी लागू शकतो. तुमचे पैसे कोणत्या खात्यात गेले आहेत हे तुम्ही बँकेतून जाणून घेऊ शकता.संबंधित शाखेशी बोलून तुम्ही रक्कम काढू शकता. बहुतेक प्रकरणांमध्ये चुकून ट्रान्सफर झाले रक्कम प्राप्त करता परत करण्यास तयार असतो. पण जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकता. अशा प्रकरणांमध्ये तुमच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. बँकेकडे तक्रार नोंद करून तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. आरबीआयच्या(RBI) मार्गदर्शक तत्वानुसार जर चुकून दुसऱ्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर कारवाई करावी लागेल चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात पैसे परत करण्याची व्यवस्था बँकेला करावी लागेल.

Leave a Comment

x