मोठी बातमी 1 ली ते 12 वी च्या अभ्यासक्रमात इतके टक्के कपात how many reduction in academic curriculum

मोठी बातमी 1ली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात इतके टक्के कपात

देशातील कोरोना ची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. राज्यात अनेक ठिकाणी लॉक डाऊन तर काही ठिकाणी कळक निर्बंध सुद्धा आहेत. दुसऱ्या लाटेमुळे याही वर्षी शैक्षणिक सत्र सुरू करायचे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह. परंतु अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे.

मोठी बातमी 1 ली ते 12 वी च्या अभ्यासक्रमात इतके टक्के कपात how many reduction in academic curriculum

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहे.त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना ची दुसरी लाट आल्यामुळे याहीवर्षी शैक्षणिक सत्र ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे.

ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केले होते. कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि करूनच या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी ट्विट द्वारे दिली आहे. कोरणामुळे यंदाही शाळा वेळेस सुरू ना करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावेत या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

x