होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशा प्रकारे उपचार घ्यावा Home Quarantine Treatment

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशाप्रकारे उपचार घ्यावा

कोरोनाव्हायरस चा उद्रेक पुन्हा देशभरात सुरू असून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना ची नवीन लक्षणे समोर येत आहेत. देशात दररोज वाढत असलेल्या रुग्ण संख्या मुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून सुद्धा रुग्ण संख्या च्या वाढत्या प्रमाणामुळे रूग्णांवर उपचार करणे कठीण झाले आहे.

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी कशा प्रकारे उपचार घ्यावा Home Quarantine Treatment

आपल्याला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यास आपण घरीच कवारन्टइन व्हा. असा सल्ला डॉक्टर्स देखील देत आहेत. जर आपल्याला माईड लक्षणे जसे खोकला,ताप, घशात खवखवणे,शरीर वेदना,वास न येणे,भूक न लागणे अशी लक्षणे आढळल्यास RT-PCR टेस्ट करून घ्या.RT-PCR रिपोर्ट दोन ते तीन दिवसांनी येत असल्याने रिपोर्टची वाट न बघता स्वतःला लक्षणानुसार क्वारनटाईन करून घ्या. होम क्वारनटाईन ट्रीटमेंट सुरू करत असताना डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. घरगुती उपाय सुद्धा सुरू ठेवून आपण बरे होऊ शकता.कोरणा ची लक्षणे दिसताच घरात सुद्धा मास्क चा वापर सुरू करा. स्वतःला आयसोलेटेड करा जाने कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना इन्फेक्शन होणार नाही.

1) आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर घाबरण्याची गरज नाही फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरीच उपचार करा. औषधांचे वेळेवर सेवन करा.घरातून बाहेर पडू नका.घरातच पल्स ऑक्सिमिटर द्वारे ऑक्सीजन पातळी चेक करा. ऑक्सीजन पातळी जर 92 च्या खाली जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. होम आयसोलेशन चा कालावधी चौदा दिवसांचा आहे त्यामुळे पूर्ण चौदा दिवस घरीच राहा. घरातील सर्व सदस्यांशी सोशल डिस्टंसिंग ठेवा.

2) घरामध्ये वेगळी खोली असेल तर त्याच खोलीमध्ये एकटे राहा. स्वतःचे साहित्य,कपडे,भांडी,औषधे वेगळे ठेवा. आपला मास्क बदलत राहा.खोलीत स्वच्छता ठेवा.वारंवार सॅनिटायझर चा वापर करा.

3)कोरोना संक्रमित असल्यामुळे वेळेवर औषधे घ्या. सात्विक आहार घ्या.भरपूर पाणी प्या. पाणी कोमट असल्यास उत्तम,अंडी, फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करा.

4) होम आयसोलेशन असताना कोरोना ची गंभीर लक्षण जसे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना, होणे, ऑक्सीजन लेवल कमी होणे असे गंभीर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णालयात दाखल व्हा.

Leave a Comment

x