उच्च रक्तदाब
सध्या संसर्गजन्य रोगापेक्षा असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इ. रुग्णांचे प्रमाण जास्त आहे व ते दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याचे तणावग्रस्त जीवन अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. तरूण वयात होणाऱ्या समस्या चे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. उच्च रक्तदाबाला एक ‘सायलेंट किलर’असे संबोधले जाते. उच्चरक्तदाब छुप्या स्वरुपात बराच काळ राहिल्यास आपल्या हृदय, किडन्या, डोळे, मेंदू या अवयांवर घातक परिणाम करतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, किडन्या निकामी होणे दृष्टी जाणे,पक्षाघात यासारखे गंभीर विकार उच्चरक्तदाबामुळे निर्माण होतात. उच्च रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळते. तरुण पिढी मध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे.तरुणांचा स्वभाव मुळातच असमाधानी अतिमहत्त्वाकांक्षी असतो. थोड्या वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात.वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताण तणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्ष यामुळे शरीरातील ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो. आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे आजाराने उद्भवणाऱ्या धोक्याची तीव्रता हे तितकेच पटीने वाढते उच्च रक्तदाब असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांमध्ये त्याचे निदान होत नाही. निदान झालेल्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. सध्या आपल्या राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू झाला आहे खरोखरच हा कार्यक्रम रुग्णांना संजीवनी देणारा आहे .18 वर्षावरील सर्व स्त्री-पुरुषांना रक्तदाब तपासणीने पुढील आयुष्यात उद्भवणारे धोके टाळता येऊ शकतात. आपण उच्च रक्तदाब म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे पडताळणी आणि उपाय यासंबंधी चर्चा करूया. उच्चरक्तदाब म्हणजे शरीरातील साधारण रक्तदाब पेक्षा जास्त दाब होय. धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो.सामान्यत: रक्तदाब 120 ते 80 असतो त्याहून जास्त आणि 140 ते 90 पर्यंतचा रक्तदाब ‘पूर्व उच्च रक्तदाब’ओळखला जातो आणि 140 ते 90 पेक्षा अधिक चा रक्तदाब वाढतो.अति मानसिक ताण, अनुवंशिक कारणे आहारात फास्ट फूड चायनीज चा वापर, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, खाण्या-पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाडण्याची जीवनशैली चिंता राग भीती मानसिक आजार, व्यायामाचा अभाव
उच्चरक्तदाबाची लक्षणे
दम लागणे, छातीत जळजळ, वारंवार चिडचिड थकवा, चक्कर येणे, झोप लागत नाही चेह-यावर पायावर सूज इत्यादी पडताडणी:ईसीजी तपासणी हृदयाच्या कपयावर किती ताण पडला आहे. रक्ताची तपासणी करून लिपिड प्रोफाइल ची पातडी युरिक ऑसिड ची तपासणी सोनोग्राफी इत्यादी.
उच्च रक्तदाबावर उपाय
नियमित व्यायाम, योगासने,आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे,ध्यानधारणा नेहमी हसतमुख राहणे, आपल्याला आवडेल तो छंद जोपासावा नेहमी प्रयत्नवादी आशावादी राहावे प्रत्येकाने आपला रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व नियमित तपासणी करून आपली आपले जीवन निरोगी करूया.