टाचदुखी वर झटपट घरगुती उपाय
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. धावपळीमुळे सतत काम करणे, कामानिमित्त उभे राहणे, वजन जास्त असेल,उंच टाचेच्या चप्पल बूट घातल्यामुळे heelpain टाचदुखी पायदुखी ची समस्या उद्भवत असते. चालणे फिरणे हा उत्तम व्यायाम आहे.परंतु चालताना टाचा दुखतात कधी कधी तर असह्य वेदना होतात. काही घरगुती उपाय कराल तर टाचेचे दुखणे नाहीसे होईल.
टाचदुखी वर झटपट घरगुती उपाय heelpain
1)खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल यांनी टाचांची मसाज करा. दहा मिनिटे सकाळी व संध्याकाळी मसाज केल्यास टाचेचे दुखणे कमी होते.
2) हळद ला आयुर्वेदामध्ये गुणकारी मानले जाते. हळदीचा लेप टाचेला लावला तर टाचेचे दुखणे कमी होईल.
3) टाचा जर जास्तच दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून 10 ते 15 मिनिटे कोमट पाण्यामधे बुडवुन ठेवा. नंतर पाय थंड पाण्याने धुऊन त्यावर माऊचरायझर लावावे टाच दुखीवर आराम मिळेल.
4) विटेचा एक तुकडा थोडासा गरम करून त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा सेक टाचा दुखत असलेल्या भागावर द्यावा.
5) गोडेतेल आणि मीठ एकत्र करून त्याचा लेप टाचेवर लावा आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावे.
6) टाच दुखी हा वादाचा एक प्रकार आहे त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूमध्ये टाच दुखीची heelpain समस्या मोठ्या प्रमाणात प्रमाणावर जाणवते त्यामुळे घरामध्ये असताना मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करावा.