जास्त प्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक Health Tips

जास्त प्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक

बरेच लोकांना गोड पदार्थ आवडतात म्हणजे साखरेचे प्रमाण आपल्या शरीरात वाढते.हीच साखर जास्त प्रमाणात घेत असाल तर सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे कारण हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.तेंव्हा साखर किंवा साखरेचे पदार्थ खत असल्यास ते लगेच कमी करा

जास्त प्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक Health Tips

1)साखर जास्त प्रमाणात घेत असल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारकशक्ती वर होतो व प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे अनेक आजार उद्भवतात.

2) आपण जरा आहारामध्ये जास्त प्रमाणात साखर घेतले तर रक्तातील साखरेची पातळी वाढते जी आपल्या मेंदूसाठी आणि आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. अशा परिस्थितीत मेंदूपर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही आणि मेंदू व्यवस्थितरीत्या काम करत नाही यामुळे स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो.

3) जास्त प्रमाणात साखर घेतल्याने आपल्या लिव्हरचे काम वाढते अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर रोगासारखा समस्या होण्याचा धोका वाढतो.

4) साखरेचे प्रमाण जर जास्त असेल तर रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढतात यामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

5) साखरेचे प्रमाण जास्त घेतल्याचे दुष्परिणाम आहेत त्यामुळे त्वचेवर पुरड,वृद्धत्व आणि सुरकुत्या होणे यासारखे त्रास होत राहतात.

6) लठ्ठपणा सर्वात सामान्य परंतु गंभीर आजार नाही तर बऱ्याच रोगांचे मूळ देखील आहे. जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपल्या शरीरात लिपोप्रोटीन लिपोज तयार होतो त्यामुळे शरीरात चरबी जमा होते आणि लठ्ठपणा वाढतो.

7) साखरेमध्ये कॅलरीच्या व्यतिरिक्त ईतर कोणतेही पोषक घटक नसतात जे आपल्या शरीरात उर्जा वाढविण्यास मदत करतील आपण साखरेचे प्रमाण जास्त घेतल्यानंतर काही वेळातच ऊर्जेची कमतरता आणि आळस पणा जाणवतो जर दीर्घकाळपर्यंत राहिले तर ते घातक ठरू शकते.

See also  आरोग्य म्हणजे काय? health education

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x