स्वतःचे हेल्थ आयडी कार्ड तयार करा आणि घ्या फायदेच फायदे Health id card

स्वतःचे हेल्थ आयडी कार्ड तयार करा आणि घ्या फायदेच फायदे

आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेचा एक भाग म्हणजे युनिक आयडी कार्ड(Unique id card). या कार्डचा फायदा म्हणजे देशभरातील निवडक रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

स्वतःचे हेल्थ आयडी कार्ड तयार करा आणि घ्या फायदेच फायदे Health id card

डिजिटल हेल्थ मिशन (digital health mission) अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तिसाठी युनिक हेल्थ कार्ड(unique health card) बनवत आहे. हे कार्ड आधार कार्ड प्रमाणेच डिजिटल कार्ड(digital card) आहे. ह्या मध्ये आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला एक नंबर मिळेल तुमच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती या कार्डमध्ये नोंदवली जाईल.संबंधित रुग्णाचे मेडिकल हिस्ट्री(medical history) या कार्डमुळे शोधले जाऊ शकते. एक प्रकारे युनिक हेल्थ कार्ड आपल्या आरोग्याची कुंडली आहे.

हेल्थ आय डी कार्डचे फायदे

1) या कार्ड चा फायदा म्हणजे आपल्याला रुग्णालयात मेडिकल हिस्ट्री असणारी फाईल सोबत घेऊन फिरावे लागणार नाही.
2) त्यामुळे हेल्थ कार्ड च्या आधारे तुमचे उपचार तुम्ही सुरू करू शकता.
3) हेल्थ कार्ड मुळे व्यक्तीला सरकारी योजनांची माहिती मिळेल.
4) रुग्णाला आयुष्यमान भारत अंतर्गत उपचार सुविधांचा लाभ मिळतो किंवा नाही हे या कार्डद्वारे कळणार आहे.
5) हेल्थ आयडी कार्ड मध्ये व्यक्ती चा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदविला जाईल. या दोन नोंदी च्या मदतीने हे कार्ड तयार केले जाणार आहे.

युनिक हेल्थ आय डी कार्ड कसे तयार करावे?

1)तुम्हाला तुमचे हेअल्थ आयडी कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला www.healthid.ndhm.gov.in या पोर्टल वर नोंदणी करावे लागेल.
2) यामध्ये तुम्हाला तुमची मूलभूत माहिती भरावी लागेल आणि त्या सोबत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
3) हे कार्ड तयार करताना आधार क्रमांक टाकावा लागेल जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आधार वापरायचं नसेल तर फक्त मोबाईल नंबर वापरून हेल्ड आयडी कार्ड बनवता येईल
4) हेल्थ आयडी कार्ड तयार करण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या वेबसाईटवर जा.
5) वेबसाइटवर create your health id हेल्थ आयडी कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
6) जर तुम्हाला आधार कार्ड वरून ओळख पत्र बनवायचे असेल तर जनरेट व्हाय आधार वर क्लिक करा त्यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करा
7)तुम्ही सहमत असाल तर आहे ॲग्री वर क्लिक करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर 6 अंकी otp येईल व्हेरिफाय करणे आवश्यक आहे ओटीपी को टाकून पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करा
8) तुमच्या मोबाईल नंबर वर हेल्थ आयडी क्रमांक एक मेसेज येईल मेसेज मध्ये दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही लॉग इन करू शकता.
9) त्यानंतर तुम्हाला नाव जन्म वर्षाच्या यासारखे माहिती विचारले जायचे सर्व माहिती भरल्यानंतर सबमित वर क्लिक करा हेल्थ आयडी कार्ड तयार होईल.

Leave a Comment

x