गट ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती Health Department Bharti2021

गट-ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत ची जाहिरात 2021 नुकतीच जाहीर झाली आहे. आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गट ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती Health Department Group D Arogy Bharti2021

नुकतीच 6/8/2021 रोजी गट क संवर्गातील 2725 रिक्त पदांची जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे. आता गट ड वर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी 3466 जागांची जाहिरात हे दिनांक 9/ 8 /2021 पासून उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात येईल. परंतु जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

जिल्हानिहाय पदसंख्या
ठाणे328, पालघर 61,अलिबाग रायगड 91,नाशिक 150, धुळे 20,अहमदनगर 59,जळगाव 52,नंदुरबार 66 पुणे 346,सातारा 6, सोलापूर 100, कोल्हापूर 83, रत्नागिरी 92,सिंधुदुर्ग 76,सांगली36, जालना 51,परभणी 75,औरंगाबाद 92,हिंगोली 61, लातूर 50,उस्मानाबाद 54 बीड 98 नांदेड 103,बुलढाणा 107,अकोला 64,वाशिम 46,यवतमाळ 5,अमरावती 152,नागपूर 267,भंडारा 109,गडचिरोली 110,वर्धा 85, गोंदिया 73, चंद्रपूर 119 उपसंचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालय 99 या पद संख्येनुसार शिपाई, वॉर्डबॉय,कक्ष सेवक आणि इतर पदे भरण्याची प्रस्तुत आहे.

अर्ज करण्याची पद्धती,आवश्यक अहर्ता, आरक्षण वयोमर्यादा,शुल्क, निवडीचे सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबींचा सविस्तर तपशील विभागाच्या या
http://arogy.maharashtra.gov.in
http://nrhm.maharashtra.gov.in
http://arogybharti2021
वेबसाईटवर दिनांक 9/8/2021 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी अर्ज करण्याकरता वेबसाइटवर असलेल्या माहितीचे सविस्तर जाहिरातीच्या अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सोमवार दिनांक 9/8/ 2021 पासून उमेदवारांना या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून दिले जातील. सदर ऑनलाईन अर्ज करण्याचे कालमर्यादा 9/8/ 2021 पासून ते 22/ 8/2021 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत खुले करण्यात येईल.

Leave a Comment

x