स्वच्छता आणि आरोग्य hand wash benefits

स्वच्छता आणि आरोग्य

व्यक्तिगत स्वच्छता

आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छतेवर बहुतांशी आपले आरोग्य अवलंबून असते.रोग शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळे निर्माण होतात.परजीवी जंतू खरूज, फोड, दात किडणे,अतिसार हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाडल्यामुळे होतात.व्यक्तीने स्वच्छतेचे जर पालन केले तर हे रोग आपल्याला टाळता येऊ शकतात.

तोंडाची स्वच्छता

दात घासण्यासाठी दातांचे मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते. दिवसातून दोन वेळा ब्रश करणे आवश्यक असते. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळा ब्रश करणे आवश्यक असते. कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरून टाका.अन्यथा तोंडाला दुर्गंधी येते. हिरड्या खराब होतात आणि दात किळायला लागतात. पोषणयुक्त आहार घ्या. मिठाई, चॉकलेट लहान मुलांनी कमी प्रमाणात खावे. दात किडण्याचे लक्षण आढळून आल्यास या काळात दंतशल्यचिकित्सक यांचा सल्ला घ्या.

हातांची स्वच्छता

आपण आपल्या हातांनी अन्न खाण्याच्या नंतर शैच मलमूत्र नंतर नाक कान स्वच्छ करणे त्यानंतर इतर कामे करणे अशा सर्व काम करतो ते करत असताना अनेक रोगकारक जंतू नाकातोंडावर, हातावर बसतात त्यामुळे प्रत्येक काम केल्यानंतर स्वच्छ हात केल्याने अनेक रोग टाळता येतात. नेहमी आपले नखे कापावेत.मुले हे चिखलामध्ये खेळतात जेवणापूर्वी त्यांनी हात धुण्याची सवय लावावी

त्वचेची स्वच्छता

त्वचा शरीरातील घाम बाहेर काढून टाकण्यास मदत करते. एखाद्या वेळेस खराब त्वचेमुळे मुरूम तयार होतात त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देते.शरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचे तापमान योग्य राखण्यास मदत करतात. आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करा.

नाक कान डोळे यांचे स्वच्छता

दररोज स्वच्छ पाण्याने आपले डोळ्येव्हावे तसेच कान सुद्धा स्वच्छ करावेत.आठवड्यातून एकदा तरी कापसाच्या बोळ्याने स्वच्छ पाण्याने कान साफ करावेत. नाकातील स्त्राव वाढून तो वाळत राहतो त्यामुळे नाक बंद होते. त्यामुळे आवश्यक तेव्हा नाक स्वच्छ करावे. मुलांना जेव्हा थंडी वाजून नाक वाहायला लागतं तेव्हा त्यांचं नाक मऊ कापडाने स्वच्छ करावे.

डोक्याची स्वच्छता

आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शाम्पू किंवा शिकाकाई वापरून आंघोळ करावी. तसेच दोन ते तीन दिवसानंतर डोक्याची तेलाने मॉलिश सुद्धा करा शौच आणि मूत्र विसर्जनानंतर सम्बधित जागा आणि हात स्वच्छ पाण्याने मागून-पुढून धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत. आपले हात साबणाने धुण्यास विसरू नका संडास आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा उघड्यावर शौचास बसू नका.

घर आणि परिसराची स्वच्छता

घराची आणि परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे ह्या मध्ये बरेच प्रश्न आहे निकृष्ट राहणीमान म्हणजे गरिबी असल्याने निर्माण होत असतात. पण काही थोड्या प्रश्न माहितीमुळे सुटू शकतात. घरासाठी आणि परिसरासाठी योग्य ती जागा असणे आवश्यक असते. घराचे बांधकाम आणि रचना कशा पद्धतीची आहे यावर सुद्धा स्वच्छता अवलंबून राहते. घरामध्ये आंघोळीसाठी स्नानगृह असायला हवे तसेच मलमूत्र विसर्जनासाठी संडास असावा. घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट म्हणजेच शौच खड्डा सुद्धा असावा. जर घरामध्ये जनावरे असेल तर त्यांच्यासाठी वेगळा गोठा सुद्धा असावा. तसेच पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी स्वच्छ पाणी सुद्धा असावे.

परसबाग

आपल्या घराजवळच्या रिकाम्या आणि मोकळ्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय. घरातील सांडपाणी पाणी वाहत जाते त्या पाण्याचा उपयोग परसबाग तयार करून त्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या आणि वेल लावता येतात.त्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट केल्यास आपल्याला हिरव्यागार पालेभाज्या सुद्धा मिळू लागतील.परसबागेसाठी जी जागा निवडली असेल त्या जागेवरचे माती घट्ट दाबून घ्यावी.त्यामुळे ते घट्ट बसते त्या घट्ट मातीमध्ये एक पन्हाळ काढावे म्हणजे पाण्याला जायला वाट निर्माण होईल.मातीचे कौल लावले तरी चालेल म्हणजे त्या नालीमध्ये घाण अडकून बसणार नाही. घरातील पाणी हे वाहते राहील अशाप्रकारे एक प्रकारचे नाले तयार करावे.ऋतूनुसार कोणत्या भाज्या भागामध्ये लावायच्या त्याचे नियोजन करावे परसबाग यामुळे आपल्याला आवडीची आणि ताजी भाजी मिळतील. त्यामुळे आरोग्य चांगले राहील पैशाची सुद्धा बचत होईल पैशाची गरज भागवून उरलेल्या भाचीच्या विक्रीमुळे आर्थिक उत्पन्न मिळेल. परसबागेचा कार्यक्रम महिलांना गटांमध्ये चांगल्याप्रकारे करता येईल.

कंपोस्ट

कंपोस्ट म्हणजे कुजवणे घरादारातील कचरा हा योग्य पद्धतीने कुजवल्यामुळे त्याचे अनेक फायदे होतात. त्यापासून आपण शेतीसाठी खत निर्माण करू शकतो. हवेशीर कुजवल्यामुळे उष्णता निर्माण होऊन जंतू मरतात.कीटकांची सुद्धा निर्मिती होत नाही. बऱ्याच कुटुंबाकडे जनावरे फारसे नसतात.अशा कचर्यासाठी जैविक कचरा व्यवस्थापनासाठी ही एक सोपी पद्धत आहे. रोजचा जैविक कचरा या खड्ड्यात टाकावा. त्यावर पातळ शेन त्यावर टाकून मिसळावे. या थरावर कचरा टाकत राहा पूर्वीप्रमाणे शनावर मातीचा थर द्यावा याप्रमाणे खड्डा भरून जाईल. याचप्रकारे खड्डा करून कचरा टाकणे चालू ठेवावे. त्यानंतर वरती चिखलाचा थर देऊन टाकावे हा भरलेला खड्डा तसाच ठेवून आता दुसरा खड्डा वापरायला घ्यावा. सहा महिन्यात पहिल्या खड्ड्यात उत्तम खत तयार होते.

पाणी स्वछता

नदी,नाले,ओढे झरे यांचे पाणी बहुधा खराब असते.पाणी शुद्ध करण्यासाठी खालील उपाय आहेत पाणी भांड्यात काढून साठवून ठेवल्या नंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो दिवसभर पाणी स्थिर ठेवल्यास आणि ते वापरल्यास झालेल्या 90% जंतू नष्ट झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रिया लवकर होते हे सर्वात स्वस्त व सोपी पद्धत आहे. साथीच्या काळात मात्र रासायनिक शुद्धीकरण केलेले बरे.किमान पाच मिनिटे उकळून ठेवणे हा खात्रीचा उपाय आहे. पण मोठ्या प्रमाणावर करायचा झाल्यास खर्च खूप आहे. ब्लिचिंग पावडर वापरून पाणी निर्जंतुक करता येते. नदी, तलावांचे पाणी भरून आणण्याची पद्धत असेल हा उपाय करावा लागतो.

यासाठी क्लोरीन च्या गोळ्या किंवा पातळ औषध मिळते.गोड्यांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीत किती प्रमाणात किती रसायने सोडायचे हे दिलेले असते.औषध किंवा गोळी टाकल्यानंतर हे पाणी सुमारे अर्ध्या तासाने वापरावे. मलमूत्राची विल्हेवाट उघड्यावर संडास केल्यामुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे रोगाचा प्रसार होतो रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या विस्टेट रोगाचे जंतू,अंडी असतात ते व्यक्तीच्या डोळ्याला दिसू शकत नाही आणि ते शरीराला अपायकारक असतात. हे जंतू पाण्यामार्फत भाजीपाला मार्फत हाताचा स्पर्श मार्फत किंवा यासारख्या घटकांमार्फत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातात. अशा रीतीने या रोगाचा प्रसार होतो उदाहरणार्थ आमांश पटकी विषमज्वर, कावीळ आजार होतात.अशा वेळेस जर संडास चा वापर केला तर रोगाचा प्रसार थांबवता येतो. शिवाय संडासात मिळालेला एकांत यामुळे तो लहान-थोर स्त्री-पुरूष सर्वांना उपयुक्त ठरतो.आजारी माणसे ही संडास चा उपयोग करता येतो.घराजवळ संडास बांधला तर संडास चा पावसाळ्यातही उपयोगी ठरतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात असणारा असायलाच हवा.

शोषखड्डा

शोष खड्डा कोणी तयार करू शकतो त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही. सांडपाण्याची विल्हेवाट होते व आपल्या आरोग्य ही निरोगी राहते. शौचखड्डा लहान-मोठा दगडाने व विटांच्या तुकड्यांनी बांधलेला असतो पाणी आणि सांडपाणी त्यात पडले कि हळूहळू जमिनीत मुरते शौचखड्डा केल्यामुळे होणारा फायदा तो म्हणजे सांडपाण्याचे योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो. मलेरिया सारखे डासांपासून आजार होत नाही व आरोग्य सुदृढ राहते शोष खड्डा जवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.

पुरेशी जागा आणि बांधकाम

घराचे बांधकाम करण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी घराचे स्थान असे निरोगी असावे.प्रदूषणापासून शक्यतो पुरेसे सुरक्षित असावे. घरातल्या माणसांच्या संख्येवरुन घराची जागा, घरातील खोल्या आणि सोय पुरेशी आहेत का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कुटुंबाच्या मानाने घर जर लहान होत असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात.घरामध्ये छोट्या छोट्या खोल्या काढून एक प्रकारची सोय करता येते. खेळयान मध्ये जागेची टंचाई असते कारण लहान लहान घरे एकमेकांना लागून असतात. पण घर जर नव्याने बांधत असाल तर जास्त सोय करणे आवश्यक असते.

घर बांधताना हवा ही खेळती राहण्यासाठी आणि इतर सुविधा सुद्धा मेळाव्यात अशा दृष्टीने घर बांधावेत घर जर थोड्या उंचीवर बांधले तर उंदीर कीटक यापासून आणि प्राण्यांपासून थोडे संरक्षण मिळते. पावसाळ्यात घराला ओल सुद्धा येत नाही. घरे टाईस किंवा सिमेंटच्या कोपा केल्यास स्वच्छता राहू शकते. कोपा चा खर्च फारसा येत नाही खिडक्या समोरासमोर असाव्यत हवा खेळती राहते. घरावर पत्रे नसतील तर कौल फायद्याचे ठरते. मातीच्या भिंती मुळे घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहते. आधुनिक पद्धतीने घर बांधणे यासाठी नावाजलेल्या मातीच्या विटा वापरण्याची पद्धत आहे.

गोठा व जनावरे

ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरांमध्येच गुरे बांधण्याची पद्धत सर्रास दिसून येते. गुरांची काळजी व खर्च जास्तअसल्यामुळे गुरे घरात ठेवण्याची पद्धत आहे गुरांमुळे गोचीड, शेणातील जन्तु यांचा त्रास तर होतोच. काही आजार त्यामुळे घरात येतात. मुख्यतः श्वसनसंस्थेचे जंतुदोष त्वचारोग रोगांचा त्रास गोठ्यामुळे घरात येतो त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी घरांपासून गोठा हा दूरच लांब ठेवला पाहिजे. वाऱ्याची दिशा पाहून गोठा ठेवल्यास जास्त चांगले .ज्यांना वेगळा गोठा ठेवणे शक्य नाही त्यांनी गोठा घर मध्ये सलग भिंत ठेवावी. ह्यात मध्ये दार ठेवू नये. जनावरांचे मलमूत्र ही एक मोठी समस्या आहे हाताने शान गोळा करणे आणि त्याचा वापर करणे ही व्यक्तिगत आरोग्याला अपायकारक असते.

परिसर स्वच्छता

परिसर स्वच्छता ही मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे मात्र आपल्या देशात खेळांमध्ये अनेक शहरांमध्ये गलिच्छ तेचे साम्राज्य दिसते. रस्त्यावर वाहत्या सांडपाणी, उघड्यावर मलमूत्र विसर्जन, कचरा, प्रदूषण यामुळे सर्व हानिकारक वातावरण निर्माण होते.यामुळे व्यक्तिगत आरोग्याला आणि सार्वजनिक आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होतो.संपूर्ण स्वच्छता अभियान राबवणे हे सरकारी योजना असल्या तरी व्यक्तिगत स्वच्छता म्हणून आपण परिसर स्वच्छ ठेवू शकतो. स्वतःपासून सुरुवात जर केले तर ही एक सामाजिक चळवळ बनून सर्व परिसर स्वच्छ होईल. मानवाने मानवाचि विष्ठा वाहुन नेने हा संपूर्ण समाजालाच कलंक आहे. जोपर्यंत रस्त्यावर मलविसर्जन होत राहील तोपर्यंत काहीही साध्य होणार नाही स्वच्छता अभियानाची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे.

कुटुंबा वस्ती गाव शहर या सर्व पातळ्यांवर स्वच्छता निर्माण व्हायला पाहिजे. संस्कृती आरोग्य मानवी प्रतिष्ठा आर्थिक प्रगती या सर्वांसाठी स्वच्छता फार महत्त्वाचे आहे. बरसे आजार डासांमार्फत पसरतात. आपले आरोग्य बिघडू नये यासाठी प्रत्येक कुटुंबाने काळजी घेणे गरजेचे आहे स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे बराच खेळांमध्ये अंघोळीचे पाणी भांडी घासेनेचे पाणी गल्ल्या ने मोकाट पाणी सोडले जाते त्यामुळे अशा काही जागा असतात त्यापासून डासाची उत्पत्ती होण्यास मदत होते ह्या सर्व कारणीभूत गोष्ट माणूस आजारांना प्रोत्साहन देतो काही दिवसांनी आजाराचे प्रमाण इतके वाढते की डास नियंत्रणात आणणे कठीण होते. मग त्यावेळी माणूस त्रस्त होतो आणि होता अशा लहान-मोठ्या आजारांना बळी पडतो.

Leave a Comment

x