झटपट केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय Hair tips

झटपट केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Hair tips केस लवकर वाढवण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी आपण खूप उपाय करत असतो. कधी आपण केसांना तेल लावून मसाज करतो.तरीसुद्धा केस लांब होत नाहीत. आपल्या घरीच असे काही उपाय आहेत जे आपले केस लांब आणि चमकदार करण्यास मदत करतील.

झटपट केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय Hair tips

1) केस वाढवण्यासाठी आपण कांद्याचा उपाय करू शकता. कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फर मुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे.

2)केसांच्या वाढीसाठी कोरफड गुणकारी आहे. कोरफड फाडून घेतल्या नंतर त्यातील जेल काढा. त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा. एक तास असाच राहू द्या आणि नंतर शाम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा प्रयोग करू शकता.कोरफडमध्ये केसांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे असतात त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

3) केस लवकर वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे.केसांच्या आरोग्यासाठी आहारात प्रोटिन्, विटामिन,व्हिटॅमिन इ,झिंक यासारखे पोषक घटक असणारे पदार्थ घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ अंडी,मांस,मासे,मोड आलेली कडधान्य तसेच पालेभाज्या,फळे यांचाही समावेश असावा.

4) केसांची वाढ लवकर होण्यासाठी अंड्याचा वापर आठवड्यातून एकदा करावा यासाठी दोन अंडे फोडून त्यातील पिवळा भाग काढून टाकावा.अंड्यातील पांढरा भागांचा थर केसांना लावावा. पंधरा मिनिटांनी केस धुऊन घ्यावेत.यामुळे केस लवकर वाढतात.तसेच ते मजबूत व घनदाट होतात, कारण अंड्याच्या पांढऱ्या भागांमध्ये प्रोटिन्स, सल्फर,लोह फॉस्फरस आणि आयोडीन यासारखी केसांसाठी उपयुक्त असणारे पोषक तत्वे असतात.

Leave a Comment

x