मोठी बातमी बँक बुडाली किंवा बंद झाली तरी टेन्शन नाही खातेदारकांना मिळाला दिलासा,Good news all bank holders

मोठी बातमी बँक बुडाली किंवा बंद झाली तरी टेन्शन नाही खातेधारकांना मिळाला दिलासा

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे. ह्या बैठकीमध्ये DICGC कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आलेली आहे.

मोठी बातमी बँक बुडाली किंवा बंद झाली तरी टेन्शन नाही खातेदारकांना मिळाला दिलासा,Good news all bank holders

आता या संदर्भातील बिल संसदेत मांडले जाईल यानंतर जर एखादी बँक बुडाली तर ग्राहकांना विम्याची रक्कम 90 दिवसाच्या आत मध्ये मिळून जाईल. 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याबाबत च्या या कायद्यातील सुधारणा या प्रस्तावाला मंजुरी मिळालेले आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन कायद्यातील सुधारणा ला मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे विम्याचे मर्यादा वाढेल. आणि याअंतर्गत 98.3 टक्के बँक खातेधारक कवर होत आहेत.

हे बिल संसदेच्या मान्सून सत्रात मांडण्यात येणार आहे या सुधारणांमुळे खातेधारक आणि गुंतवणूकदारांना त्याच्या पैशा संदर्भात सुरक्षा मिळेल. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जर एखाद्या खातेदाराची बँक बुडाली तर त्याला 90 दिवसाच्या आत मध्ये विम्याची रक्कम मिळेल. यामध्ये ग्रामीण भागातील बँकासह कमर्शियली ऑपरेट होणाऱ्या बँकांचा सुद्धा समावेश आहे.

Leave a Comment

x