हळदीचे दूध अनेक संसर्गावर गुणकारी जाणून घ्या फायदे Golden Milk

हळदीचे दूध प्रत्येक संसर्गावर गुणकारी

Golden milk हळदीचे दूध सर्दी झाल्यावर किंवा शारीरिक वेदना असल्यास घरगुती उपचार म्हणून वापरले जाते. हळदीचे दूध म्हणजे गोल्डन मिल्क चे अनेक फायदे संसर्गावर आळा घालण्यासाठी होत असतो. हळद ही अँटीसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मासाठी ओळखले जाते. दुधामध्ये कॅल्शियम स्रोत भरपूर असल्यामुळे शरीरासाठी ते अमृतच आहे.

हळदीचे दूध अनेक संसर्गावर गुणकारी जाणून घ्या फायदे Golden Milk

1) जखम झाली असल्यास हळदीचे दूध शक्य तितक्या लवकर जखम बरी करण्यासाठी फायदेशीर आहे. हळदीतील गुणधर्मामुळे बॅक्टेरिया वाढू देत नाही.

2) जर आपले हात पाय दुखत असतील तर झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे वेदनेत आराम मिळतो.

3) हळदीचे दूध प्यायल्याने त्वचे मध्ये चमक निर्माण होते. त्वचेचा संसर्ग, खाज सुटणे, मुरूम इत्यादीचा नायनाट होतो. त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते.

4) सर्दी-पडसे कफ झाले असल्यास Golden milk हळदीच्या दुधाचे सेवन करावे गरम दूध सेवन केल्याने फुफ्फुस मध्ये जमा होणारी कफ देखील दूर होतो.

5) हळदीचा दूध घेतल्याने कॅल्शियम स्त्रोतामुळे हाडे मजबूत होतात हळदीचे गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढवतात.

6) कोणत्याही कारणास्तव झोप येत नसल्यास घरगुती उपाय म्हणून हळदीचे दूध प्यावे.

7) हळदीच्या दुधाचे सेवन आतड्यांना निरोगी ठेवून पाचन समस्या दूर होतात. मुळव्याध सारख्या समस्या वर हळदीचे दूध फायदेशीर आहे.

8) हळद युक्त दूध सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. व्हायरल इन्फेक्शन मध्ये हळदीचे दूध घेणे हे सर्वोत्तम उपाय आहे.

Leave a Comment

x