डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम Fruits Benefits in marathi

डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम

डाळिंब हा रोगांचा नायनाट करण्यास कारणीभूत फळ आहे असे म्हणतात. डाळिंब आरोग्यासाठी नेहमीच चांगले आहे.सध्या डाळिंब फळा च मोसम आहे. डाळिंब सेवन केल्याने रक्त वाढवण्यास देखील खूप मदत होते. डाळिंबाच्या सेवन केल्यामुळे सर्व समस्यांपासुन आराम मिळतो. डाळिंबाचे फळ खाल्ल्याने आणि डाळिंबाचा रस सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम Fruits Benefits in marathi

हिमोग्लोबिन कमी झाल्यास डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे यामुळे रक्त लवकर वाढते. डाळिंबाचा रस घेतल्याने रक्तवाहिन्या चांगल्या होतात.

डाळिंबामध्ये फायबर, विटामिन,कॅल्शियम पोटॅशियम,आयरन यासारख्या आवश्यक घटक असतात.

आठवड्यात किमान तीन ते चार दिवस डाळिंबाचा रस पिल्याने बेड कोलेस्ट्रॉल कमी होत आणि चांगल कोलेस्ट्रॉल वाढत.

बद्धकोष्टता अपचन, गैस ची समस्या दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्या आपल्याला लवकर आराम मिळेल.

तसेच डाळिंबामध्ये विटामिन्स सि विटामिन ए आणि विटामिन इ प्रामुख्याने आढळते या सर्व विटामिन च्या मदतीने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या किंवा लाइन्स होत नाही.

डाळिंबाच्या रसात पोषक घटक असतात त्यामुळे वजन वेगाने कमी होते तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.

डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने तणाव होणारे हार्मोन्स कमी होतात तसेच मेंदू देखील शांत राहतो.डाळिंबाचा रस पिल्याने ताण कमी होतो याशिवाय रक्तदाब नियंत्रणात राहतो.

डाळिंब मध्ये अनेक औषधी गुणधर्म असून अनेक समस्या वर डाळिंब गुणकारी आहे नियमित या फळाचे सेवन केल्याने निश्चित च फायदे होतात.

Leave a Comment

x