प्रथमोपचार म्हणजे काय?लक्षानानुसार उपचार,प्रथमोपचार पध्दती,प्रथमोपचार पेटी

प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीने ताबडतोब घ्यावयाची काळजी. प्रथमोपचार विषयाची कल्पना आधुनिक काळात आता जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचर काला उपचार करताना अग्रक्रम ठरवता आला पाहिजे म्हणजे आपण एखाद्या जखमी व्यक्तीला कशाप्रकारे उपचार करायचे याचे संपूर्ण ज्ञान असणे काळाची गरज आहे जर व्यक्तीला याविषयी ज्ञान असेल तर चांगला प्रकारे प्रथम उपचार करू शकेल.एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल किंवा इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपदग्रस्त व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नाई पर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना आपण प्रथमोपचार म्हणतो.असे उपचार जर केले तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.

तसेच अपघात झाला असेल मोठी इजा जर झाली असेल तर त्याची वेदना वाढतात अशा वेळी उपचार जर केले तर वेदना मर्यादित राहू शकतात तसेच त्या व्यक्तीचा रुग्णालयातील कालावधी कमी होऊ शकतो.आज प्रत्येक व्यक्तीला प्रथम उपचार कशा प्रकारे करायचे याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे .सर्वप्रथम रेड क्रॉस हे अशा प्रकारचे कार्य करणारी संघटना.ही संघटना प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आहे. अज्ञानामुळे कित्येक वेळा मनात मदत करण्याचा हेतू असूनही रुग्णांचे नुसकान होण्याचा संभव असतो कधीकधी अशा प्रकारचे ज्ञान नसेल तर उपचार हा धोकादायक ठरू शकतो. गंभीर अपघात झालेल्या जागी सामान्यता गडबड व गोंधळ उडालेला असतो. अशा वेळी डोके शांत ठेवून चटकन उपचार करणे जरूरी असते. अपघात झाला असेल अशा वेळी बघ्यांची गर्दी कमी करणे आवश्यक असते.

लक्षणानुसार करावयाचे उपचार

आपदग्रस्त मध्ये दिसणार्‍या लक्षणांच्या गंभीर ते नुसार त्याच्याकडे लक्ष पुरवणे जरूर असते. एखाद्या वेळेस खूप रक्तस्राव चालू असेल तर रक्तस्त्राव थांबवणे कडे प्रथम लक्ष द्यावे लागते. रक्तस्रावाची जागा शोधण्याकरता कपडे काढत बसण्यापेक्षा पुष्कळवेळा चटकन ते फाडावे किंवा कापणे अधिक हितावह ठरते व तोंडाला भोवतालच्या त्वचेचा रंग तसेच श्वासाचा गंध यावरून विषबाधेची कल्पना करता येते. अशा वेळेस रुग्णाला शक्यतोवर फारशे हलवू नये, त्याची मान एका बाजूस वळवून जिभ पुढे ओढावी. थंडी भरून भरू नये म्हणून पांघरून घालून नाडी बघावी.

बेशुद्ध असल्यास काहीही पेय देऊ नये वैद्यकीय मदतीसाठी संदेश पाठवावा व लक्षणानुसार ताबडतोब उपचार सुरू करावेत व्यक्ती जिवंत राहण्याकरता दोन नात्यावर शरीरक्रिया कार्यरत राहणे फार महत्त्वाचे आहे श्वास आणि रुधिराभिसरण रुधिराभिसरण क्रिया, हृदयक्रिया एकदम बंद पडल्यास व त्याच वेळी श्वास थांबुन मेंदूची भरून न येणारी आणि होण्याचा गंभीर धोका असतो. प्रत्येक प्रथमोपचारकाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.जेव्हा कोणी जखमी होते किंवा अचानक आजारी पडते तेव्हा संकटकालीन परिस्थिती असते अशा वेळी प्रथम उपचार देण्याची वेळ येते आणि हीच वेळ रोग्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. खालील काही गोष्टींवर जर आपण लक्ष दिले किंवा दिलेल्या सूचना जर लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी आपण उपचार करू शकतो.

प्रथमोपचार करीत असताना सर्वप्रथम आपल्या घरांमध्ये साहित्य आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. प्रथमोपचार साहित्य किंवा आपण आणलेली औषधे हे लहान मुलांपासून सुरक्षित ठेवा.सर्वप्रथम रोगाला वाचवताना प्रथम तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा. घडणाऱ्या प्रसंगाकडे लक्ष देऊन काय पावले उचलावीत हे ठरवा.जेव्हा शक्य असेल तेव्हा रक्तापासून किंवा इतर द्रव्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम हातमोजे घाला. रोग्याचे किंवा आपदग्रस्त ची जीप टाळूला अडकलेले आहे की नाही किंवा काही वस्तू त्यात अडकलेले नाही याची खात्री करून घ्या. त्याचा श्वास स्वच्छपणे चालू करायला हवा आणि नसेल तर त्याला कृत्रिम श्वास देण्याची लगेच गरज असते.रक्तप्रवाह आणि हृदयाचा ठोका देखील संत आहे काय हे पाहून घ्या. रक्तप्रवाह जोरात असेल त्याने विष प्यायले असेल किंवा त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले असतील तर त्वरित धावपळ करा.

अशा वेळी प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो हे फार महत्वाचे आहे की ज्या माणसाच्या मानेवर किंवा पाठीवर आघात झाले असेल त्याला मुळी च हलवू नका.ज्याने तो पुढील अपघातापासून वाचेल. जर त्याला उलटी झाली असेल तर त्याला कुशी वर करा आणि त्याला गरम ठेवण्यासाठी पांघरूण घाला. तुम्ही प्रथमोपचार देत असताना वैद्यकीय मदतीला कोणाला तरी बोलवा. अशावेळी एखादी व्यक्ती जर डॉक्टरला बोलवायला गेली असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरला गंभीरतेची परिस्थिती समजून सांगणे आवश्यक असते.अशावेळी डॉक्टरला रुग्णवाहिका येईपर्यंत कोणते प्रथमोपचार करावे हे विचारून घ्या.

अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने शांत राहणे व रुग्णाला मानसिक आधार देणे आवश्यक असते. बेशुध्द माणसाला कोणतेही पेयेदेऊ नका.त्याच्या श्वासनलिकेत अडकून वक्तीला श्वास घेण्यास त्रास होईल.बेशुध्द माणसाला जागवण्याचा प्रयत्न करू नका. घरातील काही नातेवाईक जर असतील तर अशा व्यक्तींना रुग्णांच्या ॲलर्जीविषयी किंवा इतर आजराविषयी विचारा ज्यामुळे औषध देताना त्या व्यक्तीला त्रास होणार नाही. अपघात किंवा इतर कारणांमुळे रक्‍तस्राव होत असल्यास प्रथम थांबावयास हवा.रोहिणी बंद पडून किंवा ती तुटल्यामुळे रक्तस्त्राव होत असेल तर रक्ताच्या चिरकांड्या उडतात आणि असा रक्तस्राव न थांबल्यास मृत्यू ओढवू शकतो. अशा वेळेस आपण काय करायला हवे.

पुष्कळ वेळा जखमांमध्ये रक्तस्त्रावहोत असतो अशा वेळी जखमेवर बँडेज घट्ट बांधून थांबवता येतो.असे ब्यांडेज जे निर्जंतूक असावयास हवे ब्यांडेज उपलब्ध नसल्यास स्वच्छ हात रुमाल, टॉवेल किंवा तत्सम कपडा वापरावयास हरकत नाही.अशा कापड्याच्या आतील घडीचा भाग किंवा आपण ज्याला हात लावलेला नाही असा भाग जखमेवर ठेवावा. कापूस प्रत्यक्ष जखमेवर ठेवू नये कारण त्याचे धागे जखमेच्या पृष्ठभागात चिटकुन बसतात. ब्यांडेज ने रक्तस्त्राव न थांबल्यास त्यावर आणखी एक एक करूनही रक्तस्राव न थांबल्यास इतर जखमेकडे रक्त वाहून आणणार्‍या प्रमुख रोहीनी वर बोटांनी दाब द्यावा.

रोहिणीतील रक्तप्रवाह बंद करणाऱ्या कपडा, हात रुमाल रबर वगैरे पासून बनवलेल्या साधनाला रोहिणी बंद म्हणतात सर्वात सोपा व चटकन वापरता येणारा रोहिणीबंध पुढीलप्रमाणे बनवता व वापरता येते साधारणपणे चार बोटे रुंदीची फडक्यांची घडी प्रथम दोन वेडे देऊन गाठ मारून जखम आणि ह्दय यांच्या दरम्यान असलेल्या हाताच्या किंवा पायाच्या प्रमुख रोहिनी वर बांधावे शिल्लक राहिलेल्या फडक्याच्या दोन टोकात लहान लाकडी काठी चा तुकडा ठेवून तो घट्ट राहील असी दूसरी गाढ मारावी लाकडी काठी ची दोन्ही टोके फिरून रक्तस्राव पूर्ण थांबेपर्यंत पीळ ध्यावा.

उष्माघात झाल्यास प्रथमोपचार

सर्वप्रथम ऊष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड करा. जमल्यास त्याला थंड पाण्यात ठेवा. ऊष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड पाण्याच्या ओल्या कपड्यात गुंडाळा. त्याच्या त्वचेवर पाण्याचे कपडा फिरवा किंवा थंड कापड ठेवा. तापमान कमी झाले की त्या व्यक्तीला थंड खोलीत घेऊन जा किंवा ठेवा. जर त्या व्यक्तीचे तापमान परत वाढू लागले तर परत थंड करण्याची पद्धत अवलंबा.अशा व्यक्तीला थोडे पाणी द्या. कुठलेही औषध देऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा

चक्कर येणे

जर एखाद्या व्यक्तीला चककर येत असेल तर त्याने लगेच खाली झोपावे.डोके गुडघ्या कडे न्यावे डोके गुढक्या कडे नेल्यास रक्तप्रवाह मेंदूकडे होऊ लागेल. जर रुग्ण बेशुद्ध झाला असेल तर रूग्णाचे खाली डोके वर पाय करा. अशा व्यक्तीच्या तोंडावर,गळ्यावर थंडपाणी मारा किंवा कपड्याने पुसा. बऱ्याच वेळा रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. अशा व्यक्तीला सतत प्रश्न विचारून तो पूर्णपणे शुद्धीवर आला किंवा नाही याची खात्री करून घ्या. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाण्यात बुडणे

पाण्यात पडणे, पाण्यात बुडणे अशे अनेक प्रकार घडत असतात पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण पाण्याबाहेर काढले जाते तेव्हा त्याचा श्वास अडकला असेल किंवा श्वास घ्यायला त्या व्यक्तीला त्रास होत असेल तर अशा वेळेस प्रथम त्या व्यक्तीला कृतीम श्वास दिला जातो. अशा व्यक्तीवर उपचार करायचा असल्यास त्या व्यक्तीची श्वासनलिका मोकळी करा आणि हृदय तसेच श्वास चालू असल्याची खात्री करा. ती व्यक्ती बेशुद्ध असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा. श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वास द्या.तोंडाने तोंडाला श्वास देणे हे क्रिया पाण्यात बुडलेल्या व्यक्ती साठी वापरली जाते.

फिट येणे

फिट येणाऱ्या व्यक्तीवर कोणते उपचार करायचे फिट येणाऱ्या वक्तीचे स्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात व त्यानंतर झटके येऊ लागतात.रूग्ण जीभ चावू लागतो श्वास घेने थांबू शकतो. तोंड किंवा ओढ निळे पडू शकतात.लाड गळू लागते, तोंडातून फेस येऊ लागतो. अशा परिस्थितीत रुग्णाने श्वासथांबला थांबवीला तर हे चांगले लक्षण नाही. अशा वेळेस ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. अशावेळेस रूग्णा जवळच्या सगळ्या वस्तू दूर करा व त्याच्या डोक्याखाली काहीतरी मउ द्या.रुग्णांना श्वास घेणे थांबवले तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा व त्याचा श्वसन मार्ग उघडण्याचा प्रयत्न करा. दारा खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू द्या.पेशंट च्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भाजणे

भाजण्याच्या काही विशिष्ट प्रकार सोडले तर उपचार करणे सारख्याच आहेत सर्वप्रथम भाजणे किती मोठ्या प्रमाणात गंभीर आहेत याचा अंदाज घ्या. भाजणे साधारणपणे आणीबाणीच्या प्रसंगाशी निगडीत असते उदाहरणार्थ घराला आग लागणे रस्त्यावरील अपघातात पेट्रोल पेट घेणे इ. म्हणूनच मदत करण्याचे निर्णय तितकेच महत्त्वाचे आहेत भाजलेले व्यक्ती घाबरलेली असते तिला मानसिक धक्का बसलेला असतो. अशा वेळी आपण स्वतः शांत राहून आपद्ग्रस्त व्यक्तीला भेट देणे आवश्यक आहे. गोंधळून न जाता तातडीने हालचाल करण्याची गरज आहे .कातडी जळाल्यावर शरीरातील द्रवपदार्थ कमी होतो. जळालेला कातडीत उष्णता साठवून अधिकच नुसकान होते त्यामुळे पहिल्यांदा ही उष्णता कमी करणे म्हणजे शरीर थंड करून त्याचे तापमान कमी करणे आवश्यक असते.

प्रथमोपचाराची पेटी

आपद्ग्रस्तांसाठी प्रथमोपचाराची पेटी असणे आवश्यक आहे .यामध्ये निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्टी, तसेच जखमेवर बांधण्यासाठी जाडीची पट्टी असणे आवश्यक असते,चिकट पट्टी ,त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारे बँडेज, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, छोटे टॉर्च, हातमोजे दोन जोड्या, कात्री, ब्लेड, स्वच्छ व सुती कापडाचे तुकडे ,ऑंटी सेप्टीक डेटॉल किंवा सेवलोन, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली, निरनिराळ्या आकाराच्या शेपटी पिना, साबण, प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावे औषधांची मुदत संपताच बदलावेत.

Leave a Comment

x