डोळ्यांची अशी घ्यावी काळजी,eye care

डोळ्यांची अशी घ्यावी काळजी

डोळ्यात कचरा जाणे डोळ्यात कचरा गेला की डोळे चोडू नका. प्रथम डोळे धुवा जर कचरा निघाला नाही तर कचरा कापसाने काढावा या उपायाने कचरा निघत नसेल तर आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांकडून कचरा काढून घ्या व योग्य ते उपचार करून घ्या.

डोळे येणे

डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. डोळे लाल होतात व त्यातून चिकट स्त्राव बाहेर येतो डोळे दुखतात म्हणून डोळे आल्यास डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या. डोळे स्वच्छ पाण्याने वारंवार अथवा वैयक्तिक व सामुदायिक स्वच्छतेची काळजी घ्या. आपण वापरलेला हात रुमाल व टावेल इतरांना वापरू देऊ नका.

अपघात

फटाके उडविणे, धनुष्यबाण वगैरेसारख्या धोकादायक खेळामुळे जर डोळ्यांना अपघात झाला तर कायमचे अंधत्व येऊ शकते अशा खेळण्यातील धोके मुलांना सांगा व मुले खेळताना तेथे प्रत्यक्ष लक्ष ठेवा.

तिरडेपणा

तिरळेपणा हा मुख्यत्वे दृष्टी दोषामुळे होतो लहानपणीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य चष्मा लावून तिरडे पण येण्याच्या धोका टाळता येते.

र्हस्वदृष्टीदोष

ज्यांना जवळचे नीट दिसत नाही हे त्यांना र्हस्व दृष्टी दोष आहे असे समजावे अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य नंबरचा चष्मा वापरल्यास त्यांना जवळचे सुद्धा व्यवस्थित दिसू लागते.

दीर्घ दृष्टिदोष

या व्यक्तींना लांबचे स्पष्ट दिसत नाही असे जसे विद्यार्थ्याला जर दीर्घ दृष्टी दोष असेल तर त्याला फळ्यावरील अक्षरे नीट दिसत नाहीत असे असे लोक लांबचे बघण्यासाठी डोळे तरी बारीक करतात किंवा पुढे वाकून नीट बघण्याचा प्रयत्न करतात हा दोष सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य नंबरचा चष्मा वापरून घालविता येतो.

अ जीवनसत्वाचा अभाव

जीवनसत्वाच्या अभावाने डोळ्यातील पांढऱ्या भागावर चट्टे उठतात अशा व्यक्तींनी कमी उजेडात दिसू शकत नाही, त्यालाच आपण रातांधळेपणा असे म्हणतो हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून पुढे येणारे पूर्ण अंधत्व टाळा आरोग्य केंद्रामध्ये अ जीवनसत्वाचे डोस मोफत मिळतात त्याचा फायदा घ्या.

रांजणवाडी

डोळ्याची पापणी सुस्ते व डोळे दुखू लागतात अशा व्यक्तीने गरम व स्वच्छ पाण्याने डोळे शेकावे वारंवार रांजणवाडी होत असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य नंबरचा चष्मा वापरावा

काचबिंदू

काचबिंदू झालेल्या व्यक्तीचा डोळा लाल होतो व दुखतो व त्या वक्तीस अस्पष्ट दिसते. आतील भागात असलेला ताणामध्ये वाढ होतो डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

मोतीबिंदू

मोतीबिंदू हा वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येतो. मोतीबिंदू हे वयोमानपरत्वे येणारे अंधत्व आहे डोळ्यांचा सर्वात मधला भाग पांढरा होतो अशा व्यक्तींना पाच फुटावरील हाताची बोटे सुद्धा मोजता येत नाही मोतीबिंदू वर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही शस्त्रक्रियाही आरोग्य केंद्रामध्ये मोफत केल्या जातात शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मा सुद्धा दिला जातो शस्त्रक्रियेनंतर चष्मा लावून अशा व्यक्तींना पूर्ववत दिसू लागते.

Leave a Comment

x