महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना Enemployment Allowance Scheme

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाकडून 5000 पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता म्हणून दिला जातो.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना Enemployment Allowance Scheme

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील तरुण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकते यातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना दूरवरच्या नोकरी शोधण्यासाठी ही मदत मिळणार आहे ह्या बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत अर्जदाराने किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छित असलेल्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये थेट सरकार बेरोजगार तरुणांना बँक खात्यात जमा करणार आहे अर्जदाराचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

1 ओळखपत्र
2 पत्ता पुरावा
3 पासपोर्ट आकाराचा फोटो
4 मोबाईल नंबर
5 शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
6 अर्जदाराचे आधार कार्ड व उत्पन्न प्रमाणपत्र

बेरोजगार भत्ता योजना यासाठी अटी

1) राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करेल या पैशाचा उपयोग त्यांच्या दैनंदिन कामात त्यांच्या नियमित खर्चासाठी तसेच हा भत्ता बेरोजगार तरुणांना तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.
2) या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी पास असणे आवश्यक आहे बेरोजगार भत्ता निश्चित वेळेसाठी देय असणार आहे.

बेरोजगार भत्ता पात्रता

1) अर्जदार महाराष्ट्राचा कायम रहिवाशी असावा
2)अर्जदाराचे किमान वय 21 आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावे
3)या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे
4) अर्जदाराकडे उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसावा तरच हा लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत लाभ घेणारा अर्जदार सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी किंवा कोणत्याही व्यवसायाची संबंधित खात्याला लाभ घेता येणार नाही.

Leave a Comment

x