डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
राज्यात ही योजना 5 जानेवारी 2017 रोजी राज्यातील अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना Dr B.R.Ambedkar krushi swalamban yojana
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच, नवीन विहीर इनवेल बोरिंग शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीजजोडणी इत्यादी बाबासाठी राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते.सदर मंजूर निधी पैकी 55 टक्के अनुदान हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन संचास देण्यात येईल आणि उर्वरित 35 टक्के अनुदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना साठी खालील प्रमाणे खर्च करण्यात येईल.
1)जर लाभार्थी शेतकऱ्यांचा कृषी सिंचन संच यास 79 हजार 365 पेक्षा जास्त खर्च झाला असेल तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति अधिक पीक योजनेतून 55 टक्के तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल.
2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन कृषी जलसिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेचा लाभ घेणे आवश्यक असणार आहे. या योजनेमधून फक्त टॉप अप साठी अनुदान देण्यात येईल.
3) जर ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी लाभार्थी शेतकर्यांचा एकूण खर्च एक लाख 58 हजार 630 रुपये किंवा त्यापेक्षा कमी झाला असेल तर त्या लाभार्थी शेतकऱ्यांस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन योजनांमार्फत 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
4) जर लाभार्थी शेतकऱ्यास तुषार सिंचन संच बसविण्यासाठी एकूण खर्च रुपये 79 हजार 365 किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंबा अधिक पीक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजना अंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात येईल.
5) जर लाभार्थी शेतकऱ्याचा खर्चा एक लाख 58 हजार 730 रूपये पेक्षा जास्त झाला तर त्या लाभार्थ्याला 55 टक्के अनुदान हे कृषी सिंचन प्रती थेंब अधिक पीक या योजनेतून देण्यात येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मार्फत 50 हजार रुपये अनुदानित रक्कम देण्यात येईल .सदर विषयाच्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल द्वारे मागविले गेले असून लाभार्थ्यांचे अनुदान अदा करण्यापर्यंतचे सर्व कारवाई ऑनलाइन पद्धतीनेच केली जाईल.
आवश्यक पात्रता
1लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
2 लाभार्थ्यांने जातीचे वैद्य दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
3 जमिनीचे सातबारा व आठ चा उतारा सादर करणे आवश्यक आहे.
4 लाभार्थी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असणे बंधनकारक असणार आहे
5 उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
6 लाभार्थ्याचे जमीनधारणा 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत असणे गरजेचे असणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुदान
नवीन विहीर 2,50,000
जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये
इनवेल बोअरिंग वीस हजार रुपये
पम्प संच पंचवीस हजार रुपये
वीज जोडणी दहा हजार रुपये
शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण एक लाख रुपये पन्नास हजार रुपये
पीव्हीसी पाईप तीस हजार रुपये
परसबाग पाचशे रुपये.
ok
अल्पभुदारक शेतकऱ्यांचा फायद्या साठी चांगली योजना आहे
Vihir
New vihir